प्रजासत्ताक दिन: युवा जनजागृती कार्यक्रम


 प्रजासत्ताक दिन: युवा जनजागृती कार्यक्रम 




लातूर (हरंगुळ) - ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्य जनकल्याण निवासी विद्यालयात युवा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. पीसीआरए चे व्याख्याता केदार खमितकर यांनी इंधन संरक्षणावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी रवींद्र पूर्णपात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यवेक्षक बालाजी माने, पर्यवेक्षक काळूराम पेटकर व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी प्रश्नोत्तरी स्पर्था, सक्षम प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन सन्मान करण्यात आले. 'सक्षम' ईंधन संरक्षण प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांना देण्यात आली. पीसीआरतर्फे याबाबत काही प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. इंधनाचा अपव्यय रोखण्यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारायला हवी, कोंडी टाळायला हवी, रस्त्यांची स्थिती सुधारायला हवी, वाहनांनी एक लिटर इंधनात विशिष्ट अंतर धावायलाच हवे, यासाठी विशिष्ट क्षमता असलेल्या इंधनांची सक्ती असायला हवी. आपण वाहन चालवताना हातात असलेल्या गोष्टींची काळजी घेतली तरी बरेच काही शक्य आहे. त्यात आपला पैसा, देशाचे परकीय चलन वाचणार आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे मर्यादित असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवता येईल आणि पर्यावरणाचे रक्षण करता येईल. पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ पश्चिमी क्षेत्र- मुख्य प्रादेशिक समन्वयक नंदन गजबिये, सह संचालक ऋतुराज डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा विभागात औद्योगिक, वाहतूक, कृषी आणि घरगुती क्षेत्रात इंधन बचत मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एसटी) तसेच लष्करी विभागाच्या काही वाहनचालकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने