दयानंद कला महाविद्यालयास "करिअर कट्टा" या उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय तिहेरी पुरस्कार जाहीर

 दयानंद कला महाविद्यालयास "करिअर कट्टा" या उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय तिहेरी पुरस्कार  जाहीर




लातूर:-महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या "करिअर कट्टा" या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धा 2022-23 चा निकाल गुरुवार दि. 26 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. यात दयानंद कला महाविद्यालयास 'उत्कृष्ट विभागीय  महाविद्यालय'  व उत्कृष्ट जिल्हा स्तरीय  महाविद्यालय' असे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत तर 'उत्कृष्ट विभागीय जिल्हा समन्वयक' हा पुरस्कार महाविद्यालयातील   डॉ.शिवकुमार राऊतराव यांना प्राप्त झाला आहे.त्यांचा या यशाबद्दल  प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ प्रशांत मान्नीकर , उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे,जिल्हा समन्वयक डॉ.शिवकुमार राऊतराव, महाविद्यालय समन्वयक प्रा.विवेक झंपले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.करिअर कट्टा या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयीन युवकांच्या करिअरला योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने राज्यातील निवडक महाविद्यालयामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स उभे करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले जाते. तसेच युवकांना औद्योगिक क्षेत्रातल्या विविध संधीच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत दिले जात आहे. करियर कट्टा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांगीण विकासाची संधी प्राप्त होत असल्याचे मत दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांनी व्यक्त केले.दयानंद कला महाविद्यालयास प्राप्त झालेल्या पुरस्कार बदल दयानंद शिक्षण संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष  आरविंद सोनवणे,ललीतभाई शहा,रमेशकुमार राठी, संस्था सचिव रमेश बियाणी, सुरेश जैन संजय बोरा व संस्था पदाधिकारी यांनी कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने