संविधान बदलाचे षडयंत्र हाणून पाडू याःरामराजे आत्राम
लातूर- भारतीय संविधान निर्मितीमध्ये आदिवासी नेते जयपाल मुंडा यांचेही मोलाचे योगदान राहिले आहे,पण त्यांना दुर्लक्षित केले जाते,संविधानाचा सर्वांनाच अभिमान वाटला पाहिजे.संविधानामुळे या देशातील तमाम बहुजन,आदिवासी,वंचिताना न्याय देण्याचे काम संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे, अलिकडे सर्वांचे कल्याण साधणारे भारतीय संविधान बदलण्याचे षडयंत्र सुरु आहेत,त्या विरोधात आपण सर्व खंाद्यांला खांदा लावून तो प्रयत्न हाणून पाडू या असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक रामराजे आत्राम यांनी येथे केले.लातूरच्या स्वातंत्र्य सैनिक नगर सोसायटीतील सम्राट अशोक सार्वजनिक वाचनालय विस्तारीत वाचनकक्ष -अभ्यासिकेत आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षपदी विमुक्त भटके आदिवासी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ गायकवाड हे होते.मंचावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पोटे, न्यू ज्ञान सागर इं.स्कूलचे संचालक परमवीर बारसोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संविधान अर्पण करणार्या बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करुन,तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले.तसेच राष्ट्रगीत घेण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
अध्यक्षीय समारोपात हरिभाऊ गायकवाड यांनी संविधान निर्मिते बाबासाहेबंानी संविधानाने खर्या अर्थाने बहुजानांना नव्हे सर्वंच भारतीयांना खरे स्वातंत्र्य मिळवून दिले.दलित, भटके,अल्पसंख्य,वंचित,शोषितांना त्यांनी न्याय देण्याचे काम केले आहे,त्यांच्या उपकारातून उतराई होणे शक्य नाही.त्यामुळेच शिक्षण,लेखण,भाषण,अभिव्यक्ती,
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिव बाळकृष्ण होळीकर यांनी केले.ग्रंथपाल अंजुषा काटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला महादेव राऊत,बुध्दभूषण बनसोडे,माजी लेखाधिकारी नरेंद्र गायकवाड,संस्था सहसचिव दत्ता निर्मळ,बापू शिंदे,नितीन चालक,अथर्व सोनकांबळे,राज गुरमे,प्रशांत गुरुमे आदि वाचक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा