लातूर फार्मसीच्या वतीने पूल कॉम्पस ड्राईव्ह

 
  औसा प्रतिनिधी -श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी सहयोगी मेडिसेझ बाय द डॉक्टर फॉर द डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने बी फार्मसी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिक्षण शिकत असण्याऱ्या विद्यार्थ्यासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले .पूल कॉम्पस ड्राईव्ह या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मुंबई येथील आर. बी. एम. ऑफ मेडिसेज ई लर्निंग प्रा. लि . चे श्री मनोज देशपांडे,श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. भीमाशंकर गुरुनाथ अप्पा बावगे, संस्थेचे सचिव श्री वेताळेश्वर बावगे, संस्थेचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे ,प्राचार्य डॉ. श्री श्रीनिवास बुमरेला ,प्राचार्य डॉ वीरेंद्र मेश्राम, संचालक श्री नंदकिशोर बावगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मुलाखतीसाठी लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयातुर २४ विध्यार्थ्यानी सहभाग नोंदवला होता त्यापैकी पहिल्या राऊंड साठी कु. अंकिता लक्ष्मण पालमटे,कु. ज्ञानेश्वर सुधाकर साळुंके . ,कु. प्रज्ञा बालाजी भटाने , कु. तनुजा बालाजी भोसले,कु किरण दिनकर जाधव ,कु ओंकार नागेश घोटमुकले आणि मुळे जयश्री या सात विद्यार्थ्यांची मेडिसेझ या नामांकित कंपनीत फिल्ड मेडिकल असोसिएट या पदासाठी निवड झाली आहे.त्याचे वार्षिक वेतन चार लाख रुपये आहे . अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. संग्राम देशमुख यांनी दिली . या कार्यक्रमाचे संयोजक प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे (जेवळे) आहेत   
     त्या बदल लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,हासेगाव , राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज , लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था , गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल , लातूर कॉलेज ऑफ सायन्स, लातूर ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर , या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निवड झालेले विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने