डाक अदालतीचे आयोजन

 डाक अदालतीचे आयोजन

लातूर : पोस्टाच्या सेवेबद्दल ग्राहकांच्या असलेल्या तक्रारींचा निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्यामार्फत 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी अकरा वाजता लातूर डाक अधीक्षक मुख्यालय येथे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

पोस्टाच्या उस्मानाबाद विभाग क्षेत्राशी संबंधित टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दलच्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यास अशा तक्रारींची दखल डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बतच बँक खाते, प्रमाणपत्र आदीबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख तारीख, ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली त्यांचे नाव व हुद्दा या सर्व तपशिलासह केलेला असावा.

संबंधित डाक सेवेबाबतची आपली तक्रार श्री. श्याम गायकवाडसहायक डाकघर अधिक्षक, (एचक्यु) O/o डाकघर अधीक्षक, उस्मानाबाद मुख्यालय, लातूर-413512 यांच्या नावे दोन प्रतींसह 28 जानेवारी 2023 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रीतीने पाठवावी. त्यांनतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही, असे डाकघर अधीक्षक यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने