शेतकरी नेते मोरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने औसा येथे माजी मंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अभिष्टचिंतन सोहळा
औसा तालुक्यांतील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा होणार सन्मान
शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र मोरे यांनी गेल्या तीन दशकांपासून शेतकरी चळवळीत काम करत सातत्याने शेतकऱ्यासाठी विवीध प्रश्नांवर सरकारकडे मागणी करत मोर्चे आंदोलने यात सहभाग नोंदवला कधी रस्त्यांवर कधी जिल्हाधिकारी कार्यालय तर साखर कारखाना दरबारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे काम केले आहे यावेळी त्यांचा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येणार आहे त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक मुकेशजी जाधव, कृषिभूषण धनंजय भोसले , केशव बालाजी मंदिर ट्रस्टचे राजकुमार पल्लोड, सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ बी एन राचमाले, जेष्ठ सर्वोपचार तज्ञ डॉ ए टी अरब , मुक्तेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अँड मुक्तेश्वर वागदरे , प्रख्यात विचारवंत जेष्ठ पत्रकार राजू पाटील यांचा गौरव करण्यात येणार आहे
या अभिष्टचिंतन सोहळ्यास औसा तालुक्यातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या नागरिक, शेतकरी, नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजेंद्र मोरे गौरव संयोजन समिती सदस्य सत्तार पटेल, अरुण दादा कुलकर्णी, प्रा. पी सी पाटील, राजीव कसबे यांनी केले आहे
टिप्पणी पोस्ट करा