लोकराज्य विद्या फौंडेशन समाजसेवेचे लोकविद्यापीठ

लोकराज्य विद्या फौंडेशन समाजसेवेचे लोकविद्यापीठ

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे : इस्लामपूर येथे नवीन पदाधिकारी निवड आणि पत्रकारांचा सत्कार समारंभ



इस्लामपूर प्रतिनिधी- राष्ट्रीय हिताच्यासाठी गेल्या पाच-सहा वर्षांपासून अखंडितपणे विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकराज्य विद्या फौंडेशन ही सामाजिक संस्था काम करीत आहे. लोकहिताला प्राधान्य देऊन उपेक्षित-दुर्लक्षित लोकांच्यासाठी काम करणारी संस्था म्हणून लोकराज्यची ओळख असून समाजसेवेचे ते लोकविद्यापीठ असल्याचे प्रतिपादन माजी ग्रामीण विकास,पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री अण्णासाहेब डांगे(आप्पा) यांनी व्यक्त केले.



        ते येथील लोकराज्य विद्या फौंडेशनच्या नविन कार्यकारिणी मधील संचालकांच्या निवडपत्र वाटप आणि पत्रकारांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पेठ(ता.वाळवा) गावच्या माजी लोकनियुक्त सरपंच मिनाक्षी नानासाहेब महाडिक व अध्यक्षस्थानी शिक्षक नेते,माजी आमदार भगवानराव साळुंखे उपस्थित होते.

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे पुढे म्हणाले, स्मशानभूमी स्वच्छता आणि स्मशानभूमीतच विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन लोकराज्य फौंडेशन समाज प्रबोधन करीत आहे.त्यांचे कार्य अभिमानास्पद आहे.

माजी लोकनियुक्त सरपंच मिनाक्षीताई महाडिक म्हणाल्या,महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अडी-अडचणीसाठी लोकराज्य संस्थेने सातत्याने पाठपुरावा करुन त्यांना न्याय दिला आहे. संस्थेचे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांना सामाजिक भान आणि जाणीव प्रचंड असुन त्यांनी समाजासमोर आपला आदर्श ठेवला आहे.

माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात सुध्दा लोकराज्य फौंडेशन ही संस्था काम करीत आहे.चंद्रशेखर तांदळे हा अतिशय धडपडी कार्यकर्ता आहे.तो राबवित असलेले स्मशानभूमी स्वच्छता अभियान निश्चितच कौतुकास्पद आहे.

दैंनिक रणरागिणी आणि साप्ताहिक आत्मज्योतीच्या मुख्य संपादिका संजिवनी कदम म्हणाल्या, लोकराज्य संस्थेने अगदी आपल्या नावाप्रमाणेच काम करून लोकसेवा केली आहे. त्यांचे सगळेच उपक्रम अत्यंत स्तुत्य असतात.चंद्रशेखर तांदळे हे तरुण तडफदार कार्यकर्ते आहेत. समाजसेवेचा वसा त्यांनी घेतला असून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे स्मशानभूमी स्वच्छता अभियान सुरू आहे. जागतिक पातळीवरचा हा उपक्रम असुन नवीन पदाधिकारी यांनी तोच वारसा सांभाळला पाहिजे. नवीन कार्यकारिणी मंडळाच्या कामाची सुरुवात पत्रकार बंधूच्या सत्काराने केली. भारतीय राज्य घटनेच्या उद्देश पत्रिकेच्या वाचनाने केली हा अत्यंत आगळावेगळा आणि आवश्यक उपक्रम आहे.

माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे(दादा),शंभूशाहिर प्रा.डॉ. अरुण घोडके,प्रा.डॉ.अनिल सत्रे,लोकराज्य विद्या फौंडेशनच्या नुतन अध्यक्षा,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमती अलकाताई पुजारी,लोकराज्य विद्या फौंडेशनचे नुतन उपाध्यक्ष, मसुचीवाडी(ता.वाळवा) माजी सरपंच सुहासभाऊ कदम यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे(आण्णा),जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जगन्नाथ माळी,महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी  सभापती संगीता कांबळे,सेवानिवृत्त ब्लॅक कमांडो आप्पासाहेब कांबळे, शेतकरी संघटनेचे परशुराम माळी, लक्ष्मण पाटील आदि उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकराज्य विद्या फौंडेशनच्या नुतन पदाधिकारी यांना निवड पत्र देऊन सत्कार करण्यात आला.पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला.

इतिहास संशोधक प्रा.डॉ. अरुण घोडके यांना बुसान विद्यापीठाची डी.लिट्.पदवी मिळाल्याबद्दल व प्रा.डॉ. अनिल सत्रे यांची शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर  सदस्य म्हणून निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच पैजारवाडी(जि.कोल्हापूर) येथील बाजीराव हिरवे आणि त्यांच्या पत्नी सौ.सुमन हिरवे यांनी दिड वर्षापासून अंत्यविधीचे सर्व साहित्य शेकडो लोकांना मोफत दिले आहे. त्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संयोजन राज तांदळे, ऋतूराज तांदळे,निरंजन पाटील, हर्षवर्धन तांदळे, संतोष येडसे,विश्वनाथ देसाई, विपुल इरकर,निशिकांत कांबळे,
धैर्यशिल बनसोडे, वैभव वाघमोडे यांनी केले.

स्वागत आणि प्रास्ताविक लोकराज्य विद्या फौंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर प्रकाशराव तांदळे आणि केले.
सुत्रसंचालन लोकराज्य सार्वजनिक ग्रंथालयाचे संचालक हणमंत कोळेकर यांनी तर आभार लोकराज्य विद्या फौंडेशनच्या संचालक सौ.अंजली तांदळे यांनी मानले.


*नवनिर्वाचित संचालक पदाधिकारी कार्यकारिणी:*

▪️अध्यक्षा : श्रीमती अलकाताई साताप्पा पुजारी,
▪️उपाध्यक्ष : 
सुहास भगवानराव कदम
▪️सचिव :
चंद्रशेखर प्रकाशराव  तांदळे,
▪️संचालिका :
सौ.अश्विनी लक्ष्मण पाटील,
श्रीमती आक्काताई भीमराव वाघमोडे,
सौ.अंजली जयदिप तांदळे,
सौ.सुवर्णा अशोकराव यमगर,
▪️संचालक:
बाजीराव पांडुरंग हिरवे,
पै.नजरूद्दीन महंमद नायकवडी,
शांतीसागर भूपाल कांबळे,
पै.शरद आनंदराव कोळेकर,
डॉ.माणिक शिवाजीराव हिरवे,
महेश विश्वासराव चौगुले,
राहुल रामचंद्र काळुगडे,
विश्वनाथ नागनाथ देसाई,
विजय परशुराम माळी,
दिनकर यशवंत कोळेकर,
श्रीराम सत्तु ढोले,
शुभम प्रकाश माने,
अमोल दादासाहेब फौंडे,
संतोष सदाशिव हुबाले,
संदिप दिनकरराव माळी,
निवास ज्ञानदेव कळसे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने