जल जीवन योजनेत वाढीव वस्त्यांचा समावेश करा - खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
उस्मानाबाद-भारत सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या प्रकल्पापैकी एक जलजीवन मिशन हा असून या योजनेद्वारे संपुर्ण भारतातील ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना पेयजल नळाद्वारे पुरवठा करण्याकरीता या योजनची निर्मिती करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांची एकुण संख्या 2.89 लक्ष एवढी आहे. 65 हजार कुटुंबे नळ योजने पासुन वंचित असून यांची टक्केवारी 22.47 टक्के एवढी असल्याचे जलशक्ती मंत्री,गजेंद्र सिंह शेखावत, जलशक्ती मंत्रालय, पेयजल एवं स्वच्छता विभाग यांच्या मार्फत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्न क्र. 8 च्या उत्तरात कळविले आहे.
जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनद्वारे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा केला जात असला तरी वास्तवात परिस्थिती वेगळी आहे. जिल्ह्यातील अनेक खेडी ,वस्त्या आजही नळाद्वारे स्वच्द पेयजल मिळण्यापासून वंचीत आहेत. मात्र केंद्र सरकार केवळ आकडेवारीचा खेळ करुन जनतेच्या मुलभुत प्रश्न सोडविण्यामध्ये यश आल्याचे जरी भासवत असले तरी ग्रामीण स्तरावर या योजनेची प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे.
जलस्वराज व भारत निर्माण राष्ट्रीय पेय जल योजने सारखा जल जीवन योजनेचा बोजवारा होउ नये अशा उपाययोजना सरकारने आखावी तसेच प्रत्येक गावात या योजनेला सोलर बसवणे बंधनकारक करावे अशी महत्वाची सूचना देखील सुचवली
या सर्वांवर प्रकाश टाकण्याकरीता लोकसभेमध्ये सर्वसामान्य जनतेचा आवाज खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेमध्ये प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उठवला या प्रश्नांची सरकारने लेखी उत्तर दिले आहे.
टिप्पणी पोस्ट करा