मुक्तांगण इंग्लिश स्कुल मध्ये महाशिवरात्री आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

मुक्तांगण इंग्लिश स्कुल मध्ये महाशिवरात्री आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी




लातूर-


येथील विशाल नगर परिसरातील साई मंदिर समोरील मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचालित

मुक्तांगण इंग्लिश स्कुल मध्ये महाशिवरात्री आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

करण्यात आली. 

या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या सुमेरा शेख यांनी लॉर्ड शिवशंकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या

प्रतिमेस सुमनांजली अर्पण करून अभिवादन केले.

या वेळी शाळेच्या प्राचार्या सुमेरा शेख यांनी महाशिवरात्री बाबत माहिती दिली. महाशिवरात्रीच्या

दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. हिंदू

धर्मात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानें शाळेचे विद्यार्थी शिवांश

सचिन वांगस्कर, देवांश आकाश बिलापट्टे, सारंग गुरुलिंग ईटके यांनी शिवशंकराची वेशभूषा साकारून त्यांच्या

विषयी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या विद्यार्थ्यानी हर हर महादेवच्या घोषणांनी शाळेचा परिसर

दुमदुमून टाकला.

शाळेच्या शिक्षिका प्रणिता कांबळे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी माहिती दिली त्यांच्यावर

केलेल्या संस्काराची,  त्यांचा स्वराज्यचा संकल्प, त्यांनी केलेल्या लढाया, त्यांनी जिंकलेले गड किल्ले याची

माहिती दिली व शिवाजी महाराज यांचा जीवनपट विध्यार्थ्यासमोर उभा केला. या प्रसंगी शाळेचे विद्यार्थी

अधिराज शिवाजी जाधव, शिवांश दिलीप फेरे, श्रेयश संजय माळी, वृशांक हर्षद चिपडे यांनी शिवाजी महाराज

यांची वेशभूषा साकारली होती. मुक्तांगणच्या चिमुकल्यांनी जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देऊन परिसर

दुमदुमून टाकला. 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेच्या शिक्षिका सुखदा कुलकर्णी यांनी केले या कार्यक्रमाच्या

यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने