कर्मयोगी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारक अनावरण सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे-माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर

 कर्मयोगी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारक अनावरण सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे-माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर

निलंगा/प्रतिनिधी-  महाराष्ट्राच्या जलसिंचनाचे प्रणेते व लातूर जिल्हा निर्मितीचे शिल्पकार कर्मयोगी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी 1 वाजता पार पडत आहे. या सोहळ्यासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
आपल्या भागासह महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् व्हावा आणि शिक्षणाची गंगा प्रत्येकांपर्यंत पोहचावी हा ध्यास घेऊन काम करणारे निलंग्याचे सुपुत्र कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या राजकीय कारर्कीदीत अनेक स्मरणीय कामे केलेली आहेत. राज्यात जलसिंचनाचे काम मोठ्या प्रमाणात व्हावे या उद्देशाने अनेक प्रकल्प मंजूर करून ते पुर्णतत्वास नेण्याचे काम त्यांच्याकडून झाले आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात विविध खात्याची जबाबदारी सांभाळण्यासोबतच मुख्यमंत्री म्हणूनही स्व. दादासाहेबांनी काम पाहिलेले आहे. या खात्यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात अनेक विकास कामांची मुहूर्तमेढ रोवून जिल्ह्याची निर्मिती करणारे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे केवळ निलंग्याचे नव्हे तर लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचे आवडते व्यक्तीमत्व होते. ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहचावी आणि प्रत्येकाला हाताला काम मिळावे यासाठी सातत्याने परिश्रम करणारे डॉ. निलंगेकर  यांचे काम कोणीही विसरू शकणार नाही. त्यांच्या कामाची प्रेरणा घेऊन अनेकजण राजकीय क्षेत्रात काम करत असून सामाजिक क्षेत्रातही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या कामाची प्रेरणा सातत्याने सर्वांना मिळावी या उद्देशानेच माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे भव्य-दिव्य स्मारक निलंगा येथे साकारण्यात आले आहे. या स्मारकाचा अनावरण सोहळा आज दि. 9 फेबु्रवारी 2023 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडत आहे.
या स्मारकाचे अनावरण देशाचे माजी गृहमंत्री तथा माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोहळ्यास केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्यासह श्रीमती सुशिलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच या सोहळ्यास खा. सुधाकर श्रृंगारे, माजी खा. गोपाळराव पाटील, माजी खा. डॉ. जनार्धन वाघमारे, माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ. अमित देशमुख, माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे, आ. रमेश कराड, आ. बाबासाहेब पाटील, आ. अभिमन्यु पवार, आ. धिरज देशमुख, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी मंत्री बस्वराज पाटील मुरुमकर, माजी खा. सुनिल गायकवाड, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आ. गोविंद केंद्रे, माजी आ. सुधाकर भालेराव,  माजी आ. पाशा पटेल, माजी आ. बब्रुवान खंदाडे, माजी आ. मनोहर पटवारी, माजी आ. वैजनाथ शिंदे, माजी आ. त्र्यंबक भिसे, माजी आ. रामचंद्र नावंदीकर, माजी आ. शिवराज तोंडचीरकर, माजी आ. धर्माजी सोनकवडे, माजी आ. राम गुंडीले आदींची उपस्थिती राहणार आहे. या स्मारक सोहळ्यास निलंगेकर प्रेमींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह स्मारक समिती सदस्यांनी केले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने