भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी : मेजर तुंगार
उस्मानाबाद :- संघ लोक सेवा आयोग (UPSC), नवी दिल्ली यांच्या मार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी दि. 16 एप्रिल 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या कंम्बाईड डिफेंस सर्विसेस (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेकरिता दि. 21 डिसेंबर 2022 रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूज (रोजगार समाचार) मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. संघ लोक सेवा आयोगाकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 10 जानेवारी 2023 अशी होती. कंम्बाईड डिफेंस सर्विसेस (CDS) या परीक्षेद्वारा कायमस्वरूपी व अल्पमुदतीचे कमिशन साठी निवड करण्यात येते.
कंम्बाईड डिफेंस सर्विसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि. 01 फेब्रुवारी 2023 ते दि. 09 एप्रिल 2023 या कालावधीत CDS कोर्स क्रं. 60 चे आयोजन करण्यात येत आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षाणार्थ्याची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील इच्छुक उमेदवारानी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे दि. 03 फेब्रुवारी 2023 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Facebook/वेब पेज वर Department of Sainik Welfare, Pune (DSW) वर सर्च करून त्यामधील CDS-६० या कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली सर्व परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रमांक 0253-245032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार(निवृत्त), यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा