आर्यभट्ट गणित चॅलेंज स्पर्धेत शारदा इंटरनॅशनल स्कूलचे यश

 आर्यभट्ट गणित चॅलेंज स्पर्धेत शारदा इंटरनॅशनल स्कूलचे यश

 लातूर-- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या आर्यभट्ट गणित चॅलेंज परीक्षेत पुणे विभागात येथील शारदा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
ही परीक्षा दोन स्तरावर घेण्यात आली. प्रथम स्तरावरील परीक्षेत पात्रता सिद्ध करीत शाळेचे विद्यार्थी द्वितीय स्तरावरील परीक्षेस पात्र ठरले. द्वितीय स्तरावरील परीक्षा ही पुणे विभागातील सीबीएससी शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये झाली. नववीतील राहुल बावा चाणक्य, दहावीतील अमान नजम पठाण आणि ओंकार अतुल हरनोळे यांनी यश संपादन केले.
या यशाबद्दल रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील, उपाध्यक्ष एल. एम. पाटील, प्राचार्य डॉ. अभिषेक शर्मा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने