भारतीय विमान प्राधिकरणात पर्यावरणासाठी जीवनशैली या विषयावर परिसंवाद

             भारतीय विमान प्राधिकरणात पर्यावरणासाठी जीवनशैली या विषयावर परिसंवाद





औरंगाबाद(प्रतिनिधी) दि २२ फेब्रु रोजी भारतीय विमान प्राधिकरण व पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणासाठी जीवनशैली या विषयावर विमानतळ परिसरातील 'एटीएस भवन' येथील सभागृहात परिसंवाद आयोजित करण्यात आले.  पीसीआरए चे व्याख्याता व एनर्जी ऑडिटर केदार खमितकर प्रमुख वक्ते होते.  एयरपोर्ट डायरेक्टर डी.जी. साळवे, असिस्टंट जनरल मॅनेजर (विद्युत) डी.जी. जावळेकर, सुपरिंटेंडेंट मोहन लोंढे, असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर) नीलम गौर, असिस्टंट जनरल मॅनेजर(आय टी) एस. बी. येवले आदी मान्यवरांची कार्यक्रमात उपस्थित होती. 'धन-इंधन आणि पर्यावरण' या विषयांवरती केदार खमितकर यांनी पॉवरपॉइंट द्वारे सादरीकरण केले. 'ईंधन संरक्षण की जिम्मेदारी, जन-गण की भागीदारी' या विषयावरतीचे जनजागृती भित्तिपत्रक मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. उपस्थितांना ईंधन संरक्षण प्रतिज्ञा देऊन कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले. पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ पश्चिमी क्षेत्र- मुख्य प्रादेशिक समन्वयक नंदन गजबिये, सह संचालक ऋतुराज डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा विभागात औद्योगिक, वाहतूक, कृषी आणि घरगुती क्षेत्रात इंधन बचत मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने