अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये अनुदान जाहीर!

अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना  प्रति क्विंटल 300 रुपये अनुदान जाहीर!



राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोषभाऊ सोमवंशी यांंच्या पाठपुराव्याला यश
लातूर प्रतिनिधी : राज्यात कांद्याचे भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर राज्य सरकारने प्रति क्विंटल 300 रुपये अनुदान जाहीर केले. शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा; अन्यथा अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संतोषभाऊ सोमवंशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली होती. विशेष म्हणजे सोमवंशी यांनी प्रति क्विंटल 300 रुपये अनुदान देण्याची मागणी केली होती, त्यावर सरकारने आज घोषणा केली.
लातूर जिल्ह्यात यावर्षी सातत्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. पहिल्यांदा उशिरा पाऊस त्यानंतर अतिवृष्टी, त्यानंतर गोगलगायींचा उपद्रव, अशा नैसर्गिक संकटाचा सातत्याने सामना करावा लागत आहे. यातून शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यभरात कांद्याचे भाव पडलेले आहेत, त्याला लातूर जिल्ह्याला अपवाद नाही, हेही संतोषभाऊ सोमवंशी यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार-पाच रुपये किलो दराने कांद्याची विक्री करावी लागत आहे. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केंद्र सुरू केले आहेत. असे शासन सांगत असले तरी तसे आदेश आलेले नाहीत, हेही सोमवंशी यांनी सरकारच्या लक्षात आणून दिले होते.
लातूर जिल्ह्यात अनेक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही. एवढा कमी भाव सध्या कांद्याला आहे. तरी शासनाने कांदा खरेदी केंद्र करीत सुरू करावे; अन्यथा शेतकऱ्याला प्रति क्विंटल तीनशे रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी मेलद्वारे मुख्यमंत्र्यांकडे तसेच लातूरच्या जिल्हा उपनिबंधकांकडे 7 मार्च 2023 रोजी निवेदनाद्वारे केली होती. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात बोलताना राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 300 रुपये अनुदानाची घोषणा सोमवारी केली. सोमवंशी यांच्या या पाठपुराव्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने