जागतिक महिलादिनी ज्ञानदिप महिला विकास मंडळाकडून महिला,कार्यकर्त्यांचा सत्कार

 जागतिक महिलादिनी ज्ञानदिप महिला विकास मंडळाकडून महिला,कार्यकर्त्यांचा सत्कार

लातूर,दि.१०ः खोरी गल्ली येथील ज्ञानदिप महिला विकास मंडळाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंडळाच्या अध्यक्षा मंदाकिनी गोडबोले यांनी महिला तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा शाल,पुष्पहार देवून सत्कार केला.
बुधवार,दि.८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनी आयोजित या कार्यक्रमात मंडळाच्यावतीने शांताबाई कांबळे, मीरा ससाणे, बेबी गायकवाड, पुष्पा दुधमांडे, अनुजा खुणे, ज्योती कांबळे, जजवंता वाघमारे, सुरेखा गोडबोले, साखराबाई शिंदे, शारदा कांबळे, मुकरणबाई कांबळे,मंदाकिनी गोडबोले यांचा सत्कार करण्यात आला तर यावेळी उपस्थित  माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी उपनगराध्यक्ष मोहन माने,रिपाइंचे राज्य सचिव चंद्रकांत चिकटे,रिपाइंचे मराठवाडा सरचिटणीस अशोकराव कांबळे, माजी जि.प.सभपती बालाजी कांबळे, महाराष्ट्र विकास आघाडीचे बसवंतप्पा उबाळे,प्रा.अनंत लांडगे,प्रशांत दुधमांडे, एस.टी.मस्के, डी.टी.सूर्यवंशी, कमलाकर उबाळे, रमेश कांबळे, बाळ होळीकर यांचा शाल,पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
तथागत गौतम बुध्दांपासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपर्यं महिलांचा सन्मान करण्यात आला आहे,त्यामुळे यांनी महापुरुषाच्या उपकाराची जाणीव ठेवावी,बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्यामाध्यमातून महिलांना न्याय व समता देण्याचे काम केले आहे.विविध क्षेत्रात  महिलांनी आपल्या कर्तृत्वातून आपण कशातही  कमी नाही हे दाखवून दिले आहे,असे सांगून मोहन माने यांनी दि.२५ व २६ मार्च रोजी च्या ३ री बौध्द धम्म परिषदेच्या सभामंडपाचे दि.१९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क,लातूर येथे महिलांच्या हस्ते पूजन होणार आहे,त्यासाठी जास्तीत जास्त  महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले.
प्रारंभी राजामाता जिजाऊ,राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर,क्रांतीज्येाती सावित्रीमाई,माता रमाई यांचाया प्रतिमांचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अध्यक्षा मंदाकिनी गोडबोले यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.अनंत लांडगे यांनी केले.दिग्विजय गोडबोले यांनी आभार मानले.या कार्यक्रमासाठी अजय गोडबोले, प्रल्हाद सरवदे,अजित भोसले,रत्नशील गायकवाड, महादेव कांबळे आदिंनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم