एम.एन.एस.बँक, मर्या.लातूरच्या ठेवीवरील व्याजदरामध्ये वाढ - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर-महाराष्ट्रामध्ये आपल्या विविध अशा उपक्रमामुळे लोकउपयोगास आलेल्या महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेने आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. त्याचे कारण आरबीआय ने जागतिक मंदीमुळे आपल्या व्याजदरात वाढ करून ते आज 6.50 टक्के केलेले आहे. अशी माहिती महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली.
एम.एन.एस.बँकेने आपल्या व्याजदरात वाढ करून 15 महिण्यासाठी साडेआठ टक्के व ज्येष्ठ नागरिकाला अर्धा टक्का वाढ देऊन 9 टक्के व्याज दिले जाणार आहे. तसेच 15 लाखाच्या पुढील ठेवीवरती सर्वांना 9 टक्के व्याज देण्याचा निर्णय झाला असल्याचेही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा