संघर्षातून सकारात्मकतेने जगण्याची वाट दाखवते 'टिश्यू पेपर' -श्रीमती उमा कोल्हे

संघर्षातून सकारात्मकतेने जगण्याची वाट दाखवते 'टिश्यू पेपर' -श्रीमती उमा कोल्हे
लातूर/ प्रतिनिधी शब्दांकित साहित्य मंच, लातूर यांच्या वतीने 'पुस्तकावर बोलू काही'  अॉनलाईन कार्यक्रमात बोलताना श्रीमती उमा कोल्हे यांनी मांडले मत. 
          कार्यक्रमाचे  प्रास्ताविक शब्दांकित साहित्य मंचच्या संस्थापक अध्यक्ष प्रा.नयन भादुले-राजमाने 'साहित्यनयन' यांनी केले. याप्रसंगी उमा कोल्हे म्हणाल्या टिश्यू पेपर म्हणजे वापरला, चुरगळला नि फेकून  दिला टिश्यू पेपर शोषून घेतो. ओला होतो आणि त्याचे आस्तित्व संपते. खेड्यापाड्यातून कितीतरी तरुण शहराकडे येतात त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांना हॉटेल, बार, डान्सबार अशा ठिकाणी काम करावं लागतं. ही ठिकाण लांबून पाहायला नि आनंद साजरा करायला चांगली वाटतात पण त्याची दुसरी बाजू या पुस्तकामुळे खुप जवळून अनुभवायला मिळते.
        या कादंबरीचा नायक 'अर्जुन' च्या जीवनप्रवासात त्याचे कुटूंब, मित्र, सहकारी, भाभी, हेल्पर, कॅप्टन, वस्ताद , मॕनेजर, मालक या व्यक्ती रेखा आपल्याला सोबत करतात त्याचा स्ट्रगल अधोरेखीत करतात.
            डॉ. संग्राम मोरे म्हणाले डॉ. प्रा. रमेश रावळकर यांच्या टिश्यू पेपर या कादंबरी मध्ये जगण्याचं तत्वज्ञान आहे. नाही रे वर्गाचं प्रतिनिधित्व करणारी ही कादंबरी! आपल्याला फक्त हाॅटेलचं दर्शनी रूप माहित असते. त्याच्या आत एक जग असते. काम करणारे अनेक घटक असतात. त्यांचं जगणं हे टिश्यू पेपरसारखेच आहे. वापरा आणि फेकून ध्या. पण तसं नसते .ती ही माणसे आहेत .पोटा साठी आलेली .त्याचं जीवन कितीही  विदारक असले तरी त्यांची ही स्वप्नं असतात, इच्छा आकांक्षा असतात. 
तिथे ही नाती असतात .प्रत्येकामध्ये एक माणूस दडलेला असतो. कलाकार साहित्यिक असतो .याचा चिकित्सकपणे लेखकाने शोध घेतलेला आहे.असे त्यांनी मत व्यक्त केले. लेखक डॉ. रमेश रावळकर म्हणाले
           हाॅटेल किंवा बार याच्या आतलं जग जिथे वेटर ,हेल्पर, कुक, बारबाला याचा ग्राहक कधी विचारच करीत नाही.खरं हाॅटेल इथे आहे.हे जग वेदनामय आहे.असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन मा. डॉ. प्रा. प्रभा वाडकर यांनी केले. आभार प्रा. डॉ. क्रांती मोरे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी ज्येष्ठ समीक्षक डॉ. सतीश बडवे सर, प्रा. डॉ.राजकुमार यल्लावाड (परळी वै.) 
विजया भणगे, निलीमा देशमुख, आशा पाटील(पंढरपूर), अॅड. रजनी गिरवलकर, प्रा. डॉ. क्रांती मोरे, संचिता खोत, धनश्री जाधव (डिचोली,गोवा)भातंब्रेकर(अहमदपूर), डॉ.आशा कांबळे(शिंदखेडा), आरती टोपले(गोवा), प्रा. डॉ.संभाजी पाटील, संतोष चव्हाण, डॉ.कसुमताई मोरे, मनोज पुढे, डॉ. सविता किर्ते, डॉ.सुरेखा बनकर, प्रा. अरूणा चौधरी, दयानंद माने, गणेश शेलार, गौरी देशमुख, जयश्री भताने, शिवा गुजर, अशोक गायकवाड, प्रा. गोविंद जाधव, संजय वाघ(नाशिक) कमलाकर सावंत प्रा.डॉ. दुष्यंत कटारे, प्रा. डॉ. जयद्रथ जाधव, बंडू चंद, अनिकेत दुधभाते, तहेसीन सैय्यद, ज्येष्ठ गज़लकार सुरेश गीर, सुरेखा गुरव(महाड) सरिता म्हात्रे(पनवेल) महादेव कारंडे(वाशी), डॉ. स्वाती जोशी, उषा शिंदे, वैष्णवी कळसे, अजय कुमार वंगे, प्रा.डॉ.मीना घुमे, विमल मुदाळे, सोनाली येरगले (सोलापूर) , शब्दांकित साहित्य मंचचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم