राज्यस्तरीय "राजमाता जिजाऊ "पुरस्काराने प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे सन्मानित

राज्यस्तरीय "राजमाता जिजाऊ "पुरस्काराने  प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे सन्मानित


औसा (प्रतिनिधी ) :  अविष्कार सामाजिक आणि शैक्षणिक फौंडेशन कोल्हापूर  ,यांच्या संयुक्त विद्यमानाने  श्री वेताळेश्वर शिक्षण  संस्था संचलित  लातूर कॉलेज ऑफ फार्मसी  महाविद्यालय हासेगाव , प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे (जेवळे ) यांना २०२३ चा  राज्यस्तरीय "राजमाता जिजाऊ"  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.    हा  पुरस्कार वितरण सोहळा  सोलापूर येथील शाखेत  संपन्न झाला .            राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ २०२३ पुरस्कार सोलापूर पोलीस आयुक्त दीपक आर्वे ,सचिन वायकुळे , जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री जावेद शेख या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  यांच्या हस्ते  देण्यात आला .            प्राचार्या डॉ.  श्यामलीला बावगे  (जेवळे ) यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल  तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात एका रोपट्याचं महाकाय वटवृक्ष करून ग्रामीण भागात नॉलेज सिटी रूपांतर केले,   त्याबद्दल   राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले  . 
 श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे  अध्यक्ष भीमाशंकर आप्पा बावगे, संस्थेच्या ,उपाध्यक्षा सौ . जयदेवी बावगे , सचिव   श्री  वेताळेश्वर बावगे , कोषाध्यक्ष  श्री  शिवलिंग जेवळे , लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,हासेगाव ,ज्ञानसागर विद्यालय हासेगाव लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव  राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज   , लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था  , गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल  , लातूर कॉलेज ऑफ सायन्स,  लातूर ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर  , या सर्व युनिट चे प्राचार्य, सर्व शिक्षक व  शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी यांनी डॉ. श्यामलीला बावगे (जेवळे ) यांचे अभिनंदन  करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने