स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने रविवारी ' प्रस्थान ' नाटकाचे आयोजन

 स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने रविवारी ' प्रस्थान '  नाटकाचे आयोजन 






लातूर : लातूर येथील स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने रविवारी, दि. २ एप्रिल २०२३  सायंकाळी साडेसहा वाजता पुरस्कार प्राप्त नाटक ' प्रस्थान चे आयोचजण करण्यात आले आहे. 
                                    म टा  सन्मान २०२३ ( प्रायोगिक नाटक विभाग ) मध्ये सर्वोत्कृष्ट लेखक,  सर्वोत्कृष्ट अभिनेता व  सर्वोत्कृष्ट नाटक असे विविध पुरस्कार मिळविलेल्या  या नाटकात ज्येष्ठ अभिनेत्री सुहिता थत्ते, तुषार टेंगले , गजानन परांजपे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  या नाटकाचे लेखक मकरंद साठे हे असून  निर्माता अमेय गोसावी हे तर दिग्दर्शक आलोक राजवाडे  हे आहेत. रविवारी सायंकाळी श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या कस्तुर कंचन सभागृहात होणारा हा नाट्य प्रयोग विनामूल्य ठेवण्यात आला असून प्रवेशिका रियल हनी  शॉप, ठाकरे चौक, लातूर व हरिती बुक गॅलरी, गाळा  क्रं . १०१, दुसरा मजला आदर्श कॉलनी कॉम्प्लेक्स, औसा रोड लातूर  याठिकाणी उपलब्ध आहेत. या नाटकास  लातूरच्या नाट्य रसिकांनी आवर्जून उपस्थित राहून लाभ घ्यावा,असे  आवाहन स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने श्रीनिवास लाहोटी,  अतुल देऊळगावकर, सुमती जगताप , डॉ.अजित जगताप यांनी  केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने