शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांचा सत्कार
लातूर : विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी सांगली येथील ९ व्या शहीद अशोक कामठे मॅरेथॉन स्पर्धेत २१ कि. मी. अंतर २ तास १० मिनिटात पूर्ण करून यश संपादन केल्याबद्दल येथील शिक्षण संस्थाचालकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.सांगली येथे दि. २६ मार्च रोजी ९ वी शहीद अशोक कामठे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेची सुरुवात विश्रामबाग चौक ते मिरज, मिरज ते आयर्विन पूल, जिल्हा परिषद ते विश्रामबाग चौक अशी झाली. सदरील २१ कि. मी. अंतर तेलंग यांनी २ तास १० मिनिटात पूर्ण केले.
याबद्दल संस्थाचालक संघटनेचे कोषाध्यक्ष तथा मराठवाडा पालक संघाचे अध्यक्ष प्राचार्य डी. एन. केंद्रे, संस्थाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास पवार, मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य तानाजी पाटील, संस्थाचालक संघटनेचे सचिव बाबुराव जाधव, संस्थाचालक संघटनेचे उपाध्यक्ष जे. जी. सगरे, पी. एन. बंडगर, प्रा. मारुती सूर्यवंशी आदिंनी तेलंग यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
टिप्पणी पोस्ट करा