महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य डॉ. दिनेश मौने आणि डॅा. संजय गवई यांचा सत्कार

 महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य डॉ. दिनेश मौने आणि डॅा. संजय गवई यांचा सत्कार

लातूर -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील आंतरविद्या शाखा अंतर्गत समाजकार्य अभ्यास मंडळावर महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील प्रभारी प्राचार्य तथा समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. दिनेश मौने यांची अध्यक्षपदी तर समाजकार्य विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय गवई यांची सदस्यपदी कुलगुरू मा.उद्धव भोसले यांच्या द्वारा नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.  
यावेळी भूगोल विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले, समाजकार्य विभागातील प्रा. काशिनाथ पवार, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. आनंद शेवाळे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. सदाशिव दंदे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. यशवंत वळवी, मराठी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. भास्कर नल्ला रेड्डी, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दीपक चाटे, रसायनशास्त्र विभागातील डॉ. जितेंद्र देशमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. टि. घन:श्याम, हिंदी विभाग प्रमुख डॉ. मनोहर चपळे, प्रा. डी. आर. भुरे, विरसेन उटगे, नंदू काजापुरे, संतोष येंचवाड आणि बालाजी डावकरे यांची उपस्थिती होती.  
या अभ्यास मंडळावर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथील सामाजिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. घन:श्याम येळणे, डॉ. बाबुराव जाधव आणि जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, नांदेड येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. नरहरी पाटील आदींचा समावेश आहे.  
त्यांच्या या नियुक्ती बद्दल श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, समाजकार्य विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयातील विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी   त्यांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने