महात्मा बसवेश्वर महाविद्यालया पारंपारिक वेशभूषा आणि स्वयंशासन दिन उत्साहात संपन्न

 महात्मा बसवेश्वर महाविद्यालया पारंपारिक वेशभूषा आणि स्वयंशासन दिन उत्साहात संपन्न

लातूर-श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर आणि विद्यार्थी परिषद २०२२-२३ यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन-मुक्तीसंग्राम पर्व २०२३चे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये दि.३१ मार्च ते ०२ एप्रिल २०२३ या कालावधीत करण्यात आले आहे.
या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये आज कला, वाणिज्य, विज्ञान, समाजकार्य आणि संगणकशास्त्र विभागवार स्वयंशासन दिन आणि पारंपारिक वेशभूषा सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.  
हे दोन्ही कार्यक्रम आजचे प्राचार्य विद्यार्थी संसदेचे सचिव तथा समाजकार्य विभागातील तृतीय  वर्षातील विद्यार्थी गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विविध विषयाचे अध्यापन केले.  
कला शाखेतून राजेश कोटके आणि अनिरुद्ध दूधभांडे यांनी सहभाग नोंदवला तर परीक्षक म्हणून डॉ.श्रीराम भालेराव आणि प्रा.विकास वाघमारे यांनी काम पहिले.  
वाणिज्य शाखेतून शेख समीर, मयुरी गायकवाड, विश्वजीत खाडप आणि अंकिता माकणे यांनी सहभाग नोंदविला तर परीक्षक म्हणून डॉ.राहुल डोंबे, प्रा.सोमेश्वर पंचाक्षरी आणि प्रा.अर्चना लखादिवे यांनी काम पाहिले.
विज्ञान शाखेमधून रोकडे शिल्पा, श्रुती फड आणि दिपाली कांबळे यांनी सहभाग नोंदविला तर परीक्षक म्हणून डॉ.मंतोष स्वामी, डॉ.विनायक वाघमारे आणि डॉ. दीपक चाटे यांनी केले.
समाजकार्य विभागातून समाजकार्य विभागप्रमुख योगेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती बोंथले, ऋतुजा बनसोडे, अनिल मुंडे, योगेश्वर मुळे, गणेश भावे आणि स्वप्नाली चव्हाण आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तर परीक्षक म्हणून प्रा.मारुती माळी, प्रा.सागर ठाकूर आणि डॉ.संजय गवई यांनी काम पाहिले.
स्वयंशासन दिन स्पर्धा संयोजक म्हणून डॉ.बाळासाहेब गोडबोले यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक सभागृहात पारंपारिक वेशभूषेमध्ये एक आगळावेगळा पॅटर्न निर्माण केला यामध्ये केवळ धोती आणि साडी परिधान न करता विविध महापुरुषांची वेशभूषा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी साकारली यामध्ये आरती सलगरे (जिजामाता), कृष्णा ठाकूर व धीरज गायकवाड यांनी समूह वेशभूषा, महेश धवळे (राम), ऋषिकेश करे (घोंगळी), शेख उमर, प्रणिता माने, गंगा वाघे यांनी महाराष्ट्रीयन वेशभूषा, वेरूळकर लालगुंडे, गरजे व भिसे समूह, मयूर काथवटे (कुर्ता पायजमा), मयुरी गायकवाड, योगेश कोलबुके (वारकरी), शुभम शिंदे, मोरे गोवर्धन, शेख मिसाद, मीनाक्षी ठाकरे (जिजामाता), शुभम निकम, शंभू देशमुख व समूह, मानसी बलशेट्टी (कर्नाटकी वेशभूषा), श्रुती गायकवाड (जिजाऊ), अनिल देशमाने, अतुल ढोबळे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर), अश्विन कजरे, ऋतुजा, सुषमा मदने, अविनाश माने व समूह (पोलिस व कैदी), रितेश वलके आदींनी सहभाग नोंदविला आणि विविध वेशभूषा करून महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.
पारंपारिक वेशभूषा स्पर्धा संयोजक म्हणून डॉ.मनोहर चपळे यांनी काम पहिले. सूत्रसंचालन प्रा.डी.आर.भुरे यांनी केले तर तर परीक्षक म्हणून प्रा.यू.ए.गायकवाड, डॉ.एम.बी.स्वामी, डॉ.विनायक वाघमारे आणि डॉ.शिवेश्वर मुचाटे यांनी काम पाहिले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने