भूमि अभिलेख विभाग सरळ सेवा भरती 2021 उमेदवारांच्या कागदपत्रांची 17 एप्रिलपासून पडताळणी

 भूमि अभिलेख विभाग सरळ सेवा भरती 2021 उमेदवारांच्या कागदपत्रांची 17 एप्रिलपासून पडताळणी

लातूर: भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी 28 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत झालेल्या ऑनलाईन परीक्षेचा गुणानुक्रमे निकाल (सर्वसाधारण गुणवत्ता यादी) 21 जानेवारी 2023 रोजी व सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे पदभरती प्रक्रियेसाठी कागदपत्रे पडताळणी, तपासणीसाठी उमेदवारांची सुधारीत यादी 20 मार्च, 2023 रोजी https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

या यादीतील उमेदवारांच्या कागदपात्रांची पडताळणी 17 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत भूमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनीऔरंगाबादपहिला मजल्या वरील सभागृहदमडी महलपंचायत शेजारीगणेश कॉलनीऔरंगाबाद जि. औरंगाबाद -431001 येथे होणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे व त्याच्या दोन साक्षाकिंत प्रतीसह (कागदपत्राबाबत सविस्तर सुचना https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.) उपस्थित राहावे, असे आवाहन भूमी अभिलेख उपसंचालक सु. पां. घोंगडे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने