आ. कराड यांच्या प्रयत्नातून लातूर ग्रामीण मधील ३५ रस्त्याच्या कामासाठी सव्वा सहा कोटीचा निधी
लातूर - लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ३५ रस्त्याच्या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सव्वा सहा कोटी रुपये भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले आहेत. या निधीमुळे दुरावस्था झालेल्या रस्त्याची कामे होणार असल्याने त्या त्या भागातील भाजपा कार्यकर्त्यानी नागरिकांनी आ. रमेशआप्पा कराड यांचे आभार व्यक्त केले आहेत.
ग्रामीण भागातील रस्त्याची कामे व्हावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब यांच्याकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी पाठपुरावा केल्याने लातूर ग्रामीण मतदार संघातील जवळपास ३५ कामासाठी ६ कोटी १७ लाख रुपयांचा निधी २९ मार्च २०२३ रोजीच्या पत्रानुसार मंजूर झाला आहे. त्यात ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेतून ३२ कामासाठी ५ कोटी १२ लक्ष रुपये तर इतर जिल्हा रस्त्यांचा विकास व मजबुरीकरण अंतर्गत ३ रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून लातूर तालुक्यातील १७ रेणापूर तालुक्यातील १६ आणि भादा सर्कलमधील २ रस्त्याच्या कामांना मान्यता मिळाली आहे. सदरील निधी उपलब्ध करून रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाल्याबद्दल भाजपाचे आ. रमेशआप्पा कराड यांचे त्या त्या गावातील आणि परिसरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी आभार व्यक्त केले.
लातूर ग्रामीण मतदार संघात ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेअंतर्गत १) नागझरी ते रायवाडी रस्ता कामासाठी २० लक्ष, २) काटगाव ते टाकळी फाटा रस्ता सुधारणा ३० लक्ष, ३) मढी मंदिर तांदळवाडी रस्ता सुधारणा ३० लक्ष, ४) भोसा ते मसला रस्ता करणे ३० लक्ष, ५) खंडापूर ते चिंचोलीराव वाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण १० लक्ष, ६) मांजरी ते गातेगाव रस्ता पुलाचे काम करणे २० लक्ष, ७) बोरी ते सावरगाव रस्ता पूल दुरुस्ती व पोहोच रस्ता २० लक्ष ८) तांदूळजा ते सारसा रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम ९ लक्ष, ९) गाधवड ते भिसे वाघोली रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे ९ लक्ष रुपये, १०) चिखुर्डा ते मुरुड अकोला रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे ९ लक्ष रुपये, ११) रामेगाव ते गातेगाव रस्ता दुरुस्ती पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे ९ लक्ष रुपये, १२) बोरी ते सुगाव रस्ता पूल दुरुस्ती करणे ९ लक्ष रुपये १३) भातांगळी ते भाडगाव पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे ९ लक्ष रुपये, १४) भाडगाव ते मुरंबी पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे ९ लक्ष रुपये, १५) सोनवती ते भातखेडा रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे ९ लक्ष रुपये १६) धनेगाव सोनवती रस्ता ते बाभळगाव जोड रस्त्याचे काम करणे ९ लक्ष रुपये (सर्व लातूर तालुका), १७) इंदरठाना ते आरजखेडा रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण १० लक्ष रुपये १८) इंदरठाणा ते आरजखेडा रस्ता सुधारणा करणे डांबरीकरण व मजबुतीकरण ३० लक्ष रुपये १९) खरोळा ते कुंभारवाडी रस्ता दुरुस्ती २८ लक्ष रुपये २०) पानगाव ते नरवटवाडी रस्ता दुरुस्ती करणे ३० लक्ष रुपये २१) सारोळा ते खलंग्री रस्ता दुरुस्ती करणे ३० लाख रुपये २२) गरसुळी ते कामखेडा रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे ९ लक्ष रुपये २३) वाला ते तत्तापूर रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे ९ लक्ष रुपये २४) वाला ते गरसुळी रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे ९ लक्ष २५) चाडगाव ते जिल्हा सरहद्द पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे ९ लक्ष रुपये २६) मोरवड ते नांदगाव रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे ९ लक्ष रुपये २७) मोरवड ते जिल्हा सरहद्द रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे ९ लक्ष रुपये २८) फरतपूर ते गरसुळी रस्ता पुलाचे व जोड रस्त्याचे काम करणे ९ लक्ष रुपये २९) मुरढव ते तळणी रस्त्याचे मजबुतीकरण करणे १० लक्ष रुपये (सर्व रेणापूर तालुका) ३०) लखनगाव ते हळदुर्ग रस्ता सुधारणा करणे ३० लाख रुपये ३१) भेटा ते आंदोरा रस्ता सुधारणा करणे ३० लक्ष रुपये (भादा सर्कल) जिल्हा रस्त्याचा विकास व मजबुतीकरण कार्यक्रमांतर्गत रेणापूर तालुक्यातील घनसरगाव मोहगाव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण २५ लक्ष रुपये, जिल्हा सरहद्द गरसुळी बिटरगाव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ३० लक्ष रुपये आणि लातूर तालुक्यातील वांजरखेडा पिंपरी येळी मांजरी या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ५० लक्ष रुपये याप्रमाणे तब्बल ६ कोटी १७ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. सदरील रस्त्याची कामे होणार असल्याने त्या त्या गावातील आणि परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त केले जात असून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केल्याबद्दल आ. रमेशआप्पा कराड यांचे भाजपाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा