महात्मा बसवेश्‍वरांचा पुतळा आहे तेथेच कायम ठेवण्यात यावा- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 महात्मा बसवेश्‍वरांचा पुतळा आहे तेथेच कायम ठेवण्यात यावा- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर-लातूर शहरातील रिंग रोड महात्मा बसवेश्‍वरांच्या पुतळ्यापासून जात होता रोडचे रूंदीकरण करून तेथे राजीव गांधी पुतळा ते नांदेड रोडपर्यंत ब्रिज उभारणार असल्याचे दीड वर्षापासून चालू होते. तेव्हा राष्ट्रीय महामार्गाचे मंत्री मा.ना.नितीनजी गडकरी, नागपूर विभागाचे महाराष्ट्राचे प्रमुख अधिकारी कै.एम.चंद्रशेखर यांच्या कैलास निवासस्थानी व नागपूर येथे चर्चा करून बाजूच्या सर्व व्यापारी व जमीन मालकांच्या आग्रहावरून ते ब्रिज रद्द करायला लावला होता.
यावेळी मा.खा.श्री.शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी श्री.पांडुरंग पोले साहेब व कै.एम.चंद्रशेखर यांना घेऊन गेलो असता पाटील साहेबांनी ब्रिज व चाकूर येथील रस्त्यासंदर्भात सांगितले होते. त्याप्रमाणे राष्ट्रीय मार्ग ब्रिजचा निर्णय अधिकार्‍यांनी रद्द केला.
महात्मा बसवेश्‍वरांचा पुतळा हा आम्हा सर्वांचे श्रध्दा व प्रेरणास्थान असल्यामुळे पुतळा बाजूला काढू नये अशी मागणी आपण मा.ना.नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याबाबत त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून आपण बोलणार असल्याचेही माजी आ.कव्हेकरांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय महामार्गाचे विभाग प्रमुख नागपूरचे श्री. कृष्णाजी यांच्याशी 17 एप्रिल 2023 रोजी फोनवर बोलणे झाले असून त्यांनाही महात्मा बसवेश्‍वर पुतळ्याची जागा बदलू नये तो पुतळा आहे त्याच ठिकाणी कायम ठेवावा, महात्मा बसवेश्‍वरांचा पुतळा हा आम्हा सर्वांच्या भावनेचा विषय आहे असे त्यांनी सांगितले तेव्हा मा.कृष्णाजी यांनी त्याला मुकसंम्मती दिली व पुतळा सुरक्षेचा विषय सर्वांनी सांभाळावा लागेल असेही कृष्णाजी म्हणाल्याचे माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने