लिंगायत महासंघाच्यावतीने महात्मा बसवेश्‍वर जयंतीनिमित्त जिल्हाभर कार्यक्रमाचे आयोजन

 लिंगायत महासंघाच्यावतीने महात्मा बसवेश्‍वर जयंतीनिमित्त जिल्हाभर कार्यक्रमाचे आयोजन





लातूर ः लिंगायत महासंघाच्यावतीने महात्मा बसवेश्‍वर जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी व प्रमुख गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.
22 एप्रिल 2023 अक्षय तृतीया या दिवशी महात्मा बसवेश्‍वरांची जयंती असून या जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यात लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात लातूर शहरात महात्मा बसवेश्‍वर चौकात जयंती साजरी करणे व दिवसभर प्रसादाचे वाटप, टाऊन हॉल मैदानावर रक्तदान शिबीर, दुपारी भालचंद्र ब्लड बँकेत व्याख्यानाचे आयोजन व समग्र महात्मा बसवेश्‍वर या ग्रंथाच्या 500 प्रतीचे वितरण कार्यक्रम तसेच उदगीर शहरात दि.21 एप्रिल रोजी व्याखानाचे आयोजन व 22 रोजी रक्तदान शिबीर, प्रसादाचे वाटप व जयंती साजरी तसेच निलंगा शहरात शिवाजी महाराज चौकात जयंती साजरी करण्यात येणार असुन यावेळी दिवसभर प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. औसा शहरात प्रसादाचे वाटप, व्याख्यान व ग्रंथाचे वाटप. अहमदपूर शहरात प्रसादाचे वाटप, विविध स्पर्धांचे आयोजन, शिरूर ताजबंद येथे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन, चाकूर येथे रूग्णांना फळाचे वाटप व व्याख्यान. शिरूर अनंतपाळ येथे दिवसभर प्रसादाचे वाटप, मान्यवरांचा सत्कार व व्याख्यान तथा समग्र महात्मा  बसवेश्‍वर ग्रंथाचे वाटप. देवणी येथे प्रसादाचे वाटप, ग्रंथाचे वाटप व व्याख्यान. रेणापूर येथे प्रसादाचे वाटप, ग्रंथाचे वाटप व व्याख्यान तसेच जळकोट येथे ग्रंथाचे वाटप व तसेच लिंगायत महासंघाच्यावतीने प्रत्येक गावाच्या शाखेच्यावतीने विविध कार्यक्रम व मिरवणूका काढण्यात येणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर डोके, जिल्हा संघटक काशीनाथ मोरखंडे, शहराध्यक्ष प्रा.वैजनाथ मलशेट्टे, शहर सरचिटणीस लिंगेश्‍वर बिराजदार, विश्‍वनाथप्पा मिटकरी, तानाजी पाटील, मल्लिकार्जुन कुडूंबले, बलराज खंडुमलके, माणिकप्पा मरळे, जी.जी.ब्रम्हवाले, शिवदास लोहारे, प्रा.विठ्ठल आवाळे, सुर्यकांत मळगे यांच्यासह उदगीर तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिरसे, शहराध्यक्ष सुभाष शेरे, जिल्हा उपाध्यक्ष बस्वराज ब्याळे, जिल्हा सहसचिव अमरनाथ मुळे, निलेश हिप्पळगे, निलंगा तालुकाध्यक्ष चंद्रकांत डांगे, शहराध्यक्ष डॉ.मन्मथ गताटे, तालुका सरचिटणीस अशोक काडादी, देवणी तालुकाध्यक्ष शेषेराव मानकरी, शहराध्यक्ष विजय लुल्ले, अहमदपूर तालुकाध्यक्ष महेश भिंगोले, सरचिटणीस चंद्रशेखर हमणे, चाकुर शहराध्यक्ष सुभाष शंकरे, कार्याध्यक्ष धिरज माकणे, शहराध्यक्ष संजय पाटील, गणेश पटणे, शिरूर अनंतपाळ शहराध्यक्ष परमेश्‍वर सांगवे, तालुकाध्यक्ष निळकंठ शिवणे, रेणापूर तालुकाध्यक्ष राजशेखर उकिरडे, जळकोट तालुकाध्यक्ष संपत हत्ते,  शिवदास लोहारे, शिवाजी भातमोडे, एन.आर.स्वामी, भिमाशंकर शेळके, काशीनाथ तोंडारे, अशोक तोंडारे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने