महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा न हटविण्याच्या मागणीसाठी-डॉ. अरविंद भातांब्रे यांच्या आमरण उपोषणास प्रारंभ

 महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा न हटविण्याच्या मागणीसाठी-डॉ. अरविंद भातांब्रे  यांच्या आमरण उपोषणास प्रारंभ 




लातूर : लातूर शहरातील कव्हा  नाका , महात्मा बसवेश्वर चौकातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ  पुतळा  हटविण्यात येऊ नये या मागणीसाठी ज्येष्ठ  सामाजिक कार्यकर्ते डॉ. अरविंद भातांब्रे यांनी बुधवारपासून  आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. 
                 या आमरण उपोषणास आज, बुधवार , दि. १९ एप्रिल २०२३ रोजी संगनबसव  येरटे आप्पाजी  निलंगा, बसवलिंग पट्टदेवरू आप्पाजी भालकी, बालतपस्वी निरंजन शिवाचार्य औसा,  माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर,  शिवानंद हैबतपूरे , संतोष सोमवंशी, एड. उदय गवारे, युवा नेते अभिजित देशमुख, माजी  महापौर स्मिता खानापुरे,  बसवंतप्पा  भरडे , वीरशैव लिंगायत  समाजाचे उदगीरचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे , निलंग्याचे अध्यक्ष  शिवाजीराव रेशमे  गुरुजी,  औसाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता आदी मान्यवरांच्या  प्रमुख उपस्थितीत या आमरण उपोषणास सुरुवात झाली.  डॉ.अरविंद भातांब्रे यांच्यासमवेत बसवप्रेमी लक्ष्मण मुखडे यांनीही आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. या आमरण उपोषणास शिवसेना उध्दव  बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना , आम आदमी पार्टी, मराठा संग्राम, वीरशैव तेली लिंगायत समाज,   महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती समिती आदी पक्ष - संघटनांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. जोपर्यंत प्रशासनाकडून हा पुतळा हटविला जाणार नाही,असे लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण चालूच राहणार आहे. 
जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी  संपूर्ण विश्वाला लोकशाही प्रणालीचे दर्शन घडविले. त्यांनी बाराव्या शतकात अत्यंत प्रेरणादायी कार्य केले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली त्यांचा पुतळा हटविण्यात येणार असल्याच्या चर्चेने संपूर्ण लिंगायत समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. हा पुतळा हटविण्यात येऊ नये यासाठी संपूर्ण समाज एकत्रित आला आहे. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संगनबसव येरटे आप्पाजी यांनी प्रशासनाने महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा हटवू नये असे आवाहन केले. बसवलिंग पट्टदेवरू यांनी यावेळी बोलताना महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटविण्याचा प्रयत्न केला गेल्यास त्याला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटकातूनही तीव्र विरोध करण्यात येईल असे सांगितले. यावेळी  माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, संतोष सोमवंशी, उदय गवारे, अभिजत देशमुख, शिवानंद हैबतपुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून हा पुतळा हटविला जाऊ नये,अशी मागणी केली. 
या कार्यक्रमाचे  सविस्तर असे प्रास्ताविक सोनू डगवाले यांनी केले.  सूत्रसंचालन प्रा. ओमप्रकाश झुरुळे  यांनी तर आभार प्रदर्शन बालाजीआप्पा  पिंपळे यांनी केले. 
 याप्रसंगी युवा नेते अजित पाटील कव्हेकर, बसवराज धाराशिवे, राजाभाऊ राचट्टे,, पूजाताई पंचाक्षरी,  नितिन मोहनाळे, सचिन हुरदळे, राम स्वामी, रोहित चवळे, ओम धरणे, संकेत उटगे , नरेश पेद्दे , राहुल नारगुंडे , गणेश हेरकर, ऋषी झुंजे, बसवराज रेकूळगे , विजय शेटे , सतीश पानगावे, संजय बावगे, सुनील ताडमाडगे, नितीन नारगुंडे, संतोष सुलगुडले, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने