एसव्हीएसएस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालय निकालात मुलींची बाजी

  एसव्हीएसएस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालय निकालात मुलींची बाजी


    लातूर- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०२२ चा प्रथम वर्गाचा निकाल जाहीर झाला असून ,श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित एसव्हीएसएस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाचा दरवर्षीप्रमाणे अतिशय चांगला निकाल लागला आहे. विशेष प्राविण्यासह विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम क्रमांक गौरी अशोकराव रोकडे ८१.५५ %, दुसरा क्रमांक सावली श्रीशैल बोने ७१.२९% आणि  गौरवी विनोद पांचाळ ७१.२९ %  या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, सचिव वेताळेश्वर बावगे, संचालक नंदकिशोर बावगे,  प्राचार्य डॉ विरेंद्र मेश्राम, डॉ पल्लवी तायडे, डॉ श्रद्धा नागमोडे, डॉ दिपाली जाधव, डॉ पवन कुमार, डॉ अर्निका राजपुरीया, डॉ प्रतिक मेश्राम, डॉ प्रेम सागर धाने, डॉ धनश्री शिंदे, डॉ शारदा धडे तसेच लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर, राजीव गांधी इन्स्टिट्यूट हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ आयटीआय, लातूर कॉलेज ऑफ सायन्स ,ज्ञानसागर विद्यालय, गुरुनाथप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल या सर्व युनिटच्या प्राचार्यांनी अभिनंदन केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने