शिवलीत श्री हनुमान यात्रा मोठ्या उत्साहात साजरी, हजारो भाविकांनी घेतले हनुमानाचे दर्शन

 शिवलीत श्री हनुमान यात्रा मोठ्या उत्साहात साजरी, हजारो भाविकांनी घेतले हनुमानाचे दर्शन


लातूर-  कोरोना महामारी नंतर शिवली ता. औसा येथील श्री हनुमान यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. हजारो भाविकांनी श्री हनुमानाचे दर्शन घेतले.
शिवलीचे श्री हनुमान देवस्थान जागृत असून नवसाला पावणारा असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.
 औसा तालुक्यातील शिवली येथील  हनुमान देवस्थानची यात्रेत विविध धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे पुरातन काळात मंदिरात लावण्यात आलेला दिप आजही पाजळत असल्याने या यात्रेला विशेष महत्व प्राप्त झाल्याने जिल्हयासह राज्यातील अनेक भाविक आपला नवस पुर्ण करण्यासाठी शिवली दाखल , त्यामुळेदिवसेंदिवस या हनुमान देवस्थानला मोठे महत्व प्राप्त होत आहे.
 लातूर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या औसा तालूक्यातील शिवली या गावात श्री हणुमानाचे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे  नवसाला पावणारा हनुमान म्हणून राज्यभर या देवस्थानची ख्याती प्राप्त झालेली आहे. येथे दरवर्षी हनुमान जयंतीच्या नंतर येणारऱ्या शनिवारपासून यात्रा भरते.दरम्यान कोरोणाच्या काळात मागील दोन वर्षात सदर यात्रा भरलेली नव्हते मात्र तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा यात्रा भरली .विशेष म्हणजे येथील मंदीरामध्ये पुरातन काळापासून पाजळत असलेला दिप आजही विजलेला नाही याची ख्याती सर्वदूर असल्याने राज्याच्या कानाकोपर्यातून हजारो भाविक यात्रेच्यानिमित्ताने दर्शनासाठी आले होते.
   सदरील यात्रा महोत्सवात  सकाळी ६ वा.ते दुपारी १२ पर्यंत श्री.हनुमान जन्मोत्सव व अभिषेक झाला.. दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपयर्ंत भक्तांचे लोटांगण व प्रसाद वाटप आणि रात्री ९ नंतर हरिजागर हआहे.
रविवारी दुपारी भारुड कार्यक्रम झाला.
मल्लाचा भव्य कुस्तीची दंगल पार पडली. सायंकाळी ६ ते पहाटे ६ दरम्यान श्री लक्ष्मण शक्ती भक्तीमय कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता श्री ची महाआरती व दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले 
कोरेानानिर्बंधामुळे दोन वर्षांपासून बंद असलेल्या,वरील कालवधीत मोठ्या भक्तीभावाने होत असलेल्या या श्री हनुमान यात्रा महोत्सवाचा पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ 
 घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने