समाजाची संस्कृती जोपासण्यात ज्येष्ठ नागरिकांचे महत्वाचे योगदान- प्रकाश घादगिने

 समाजाची संस्कृती जोपासण्यात ज्येष्ठ नागरिकांचे महत्वाचे योगदान- प्रकाश घादगिने

लातूर:-समाजाची संस्कृती जोपासण्यात ज्येष्ठ नागरिकांचे योगदान महत्वाचे असते त्यामुळे समाज म्हणून जेष्ठ नागरिकांचे अनुभव पुढच्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रकारची कृतज्ञता आहे असे मत जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश घादगिने यांनी व्यक्त केले.

आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन दिनांक 1 एप्रिल, 2023 ते 1 मे 2023 या सामाजिक न्याय पर्व अभियानाअंतर्गत विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणी  ग्रामीण रुग्णालय, बाभळगांव ता. जि. लातूर येथे दिनांक 18 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 9-00 वाजता ज्येष्ठ नागरिक जाणीव जागृती व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यावेळी प्रकाश घादगिने बोलत होते.

   या शिबीरासाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ. चिंचोलीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्स डॉ. आनंद कलमे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयस्वाल, डॉ. कुटवाड, डॉ. कस्तुरे तसेच दंत शल्य चिकित्सक डॉ. बालकुंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिसोदे, डॉ. आंबोरे तसेच स्टाफ नर्सेस आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या शिबीरात 49 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबीराच्या यशस्वितेसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील समाज कल्याण निरिक्षक संदेश घुगे, एस. डी. पांढरे, मनोज मोरे, नागेश जाधव, श्रीराम शिंदे, गंगाधर जोगदंडकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीराम शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नागेश जाधव यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने