एस व्ही एस एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाचा पदवी वितरण सोहळा संपन्न

 एस व्ही एस एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाचा पदवी वितरण सोहळा संपन्न   




                                     

औसा- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित एसव्हीएसएस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथील  विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी ओटीपीटी कौन्सिल ऑफ मुंबई महाराष्ट्र मेंबर डॉ अशोक पाटील यांच्या  हस्ते पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

 कार्यक्रमाची सुरुवात कोन्विकेशन मार्च व दीप प्रज्वलन करून करण्यात आले, यावेळी संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. श्यामलीला बावगे, एस व्ही एस एस फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ विरेंद्र मेश्राम, मुकेश बिदादा , रघुनाथ पाटील, गुलाब दानाई यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  डॉ अशोक पाटील यांचा सत्कार वेताळेश्वर बावगे यांनी शाल श्रीफळ व बुके देऊन केला. कार्यक्रमाची प्रस्ताविक व वार्षिक अहवाल प्राचार्य डॉ.  विरेंद्र मेश्राम यांनी सादर केले. तर डॉ अशोक पाटील यांनी "विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व फिजिओथेरपी मध्ये भविष्यात खूप करिअरच्या संधी उपलब्ध आहेत त्यासाठी तुमच्यामध्ये कष्ट व प्रामाणिकपणा असणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन केले "व तसेच विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदवी वितरण करून शपथ देण्यात आली . याप्रसंगी  डॉ.पल्लवी तायडे, डॉ श्रद्धा नागमोडे, डॉ दिपाली जाधव, डॉ पवन कुमार, डॉ अर्निका राजपुरीया, डॉ प्रतिक मेश्राम, डॉ प्रेमसागर धाने, डॉ धनश्री शिंदे, डॉ शारदा धडे व संस्थेतील सर्व युनिटचे प्राचार्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सूत्रसंचालन साक्षी बोरकुटे व उरुसा सय्यद तर आभार शिवलिंग जेवळे यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने