सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

 सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

विलासनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने दि. १८ एप्रिल रोजी कारखाना साईटवर रक्तदान शिबीर व कारखाना परिसरात असलेल्या वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी मातोश्री वृध्दाश्रम येथे अन्नदान कार्यक्रम पार पडणार आहे. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी नेहमीच समाज हिताला प्राधांन्य देऊन समाजहित जोपासले आहे. त्यांचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या विचाराला साजेल अशा पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असून सदरील कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे व संचालक मंडळाने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने