सामुहिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम वाढले पाहिजेत- रमेश बियाणी अध्यक्ष, सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा समिती, लातूर

 सामुहिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम वाढले पाहिजेत- रमेश बियाणी अध्यक्ष, सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा समिती, लातूर

 






लातूर :- सामुहिक विवाह सोहळ्याचा फायदा समाजातील सर्व घटकांनी घ्यावा असे आवाहन सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष श्री. रमेश बियाणी यांनी केले ते सोहळा समितीच्या बैठकीत बोलत होते.
बुधवार दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी श्री दयानंद शिक्षण संस्थेच्या कार्यालयात सोहळा समितीची बैठक संपन्न झाली. शहर व जिल्हयातील अनेक सामाजिक चळवळीतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बऱ्याचदा अनेक विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्च केला जातो. आर्थिक व्यवस्थापन, नियोजन बिघडते, त्यातून कौटुंबीक अडचणी वाढतात. कुठल्याही स्वरुपाचा खर्च न करता सामुहिक विवाह सोहळ्यात विवाह केला तर विवाहासाठी खर्च होणारी दोन्ही कुटुंबाची रक्कमही बचत होऊन ही नवविवाहीत जोडप्याच्या नवीन संसाराला कायमस्वरुपी हातभार लावु शकते. त्यांचे भविष्य उज्वल व जीवन सुकर होऊ शकते. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील नागरीकांनी ज्यांचे विवाह जमलेले आहेत त्याची नाव नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री सिध्देश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या भव्य प्रांगणात होणाऱ्या या सोहळ्यासाठी देवस्थानतर्फे सदस्य श्री. अशोकराव भोसले यांनी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी श्री. मोहनराव माने, चंद्रकांतराव चिकटे, प्रा. आनंत लांडगे, बसवंतअप्पा उबाळे यांच्यासह अध्यक्षीय मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विवाह नोंदणीसाठी वाड्या, वस्त्या व विविध ठिकाणी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
प्रा. गोविंदराव घार, जिल्हा बँकेचे संचालक श्री. पृथ्वीराज सिरसाठ व सोहळा समितीचे स्वागताध्यक्ष अशोकराव गोविंदपूरकर, सोहळा समितीचे सचिव डॉ. जगन्नाथ पाटील व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोहळा समितीच्या कार्याध्यक्षा सौ. शुभदा रेड्डी यांनी महिलांचा विशेष सहभाग यात राहणार असून सोमवार दि. १० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता लातूर शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील, चळवळीतील प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांची बैठक ठेवली आहे असे सागुन सर्व महिलांनी सोमवारच्या बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले. सर्वधमीय विवाह समितीचे सहसचिव अॅड. एस. एस. पाटील यांनी आभार मानले.
          महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त यांच्या संकल्पनेला पुष्टी देऊन लातूर येथील सर्व धमार्दाय संस्थांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या या सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळयास लातूर सह धर्मादाय आयुक्त कार्यालयासह, सर्व धर्मादाय संस्था ही प्रयत्नशील आहेत.
          सोशल मिडीयाचा वापर करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सोहळा पोहोंचवला पाहिजे जेणे करुन समाजातील सर्व विवाह या सोहळयामध्ये करण्यासाठी लोक प्रवृत्त होतील. असे प्रयत्न सर्वांनी ठरवुन करावेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने