व्ही एस पँथर्स च्या मिरवणुकीने लातूरकरांची मने जिंकली !!!!

व्ही एस पँथर्स च्या मिरवणुकीने लातूरकरांची मने जिंकली !!!!



लातूर: येथील व्ही एस पँथर्स च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त व्ही एस पँथर्स चे सं अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांच्या संकल्पनेतील भव्य मिरवणूक प्रदेशाध्यक्ष तथा मनपा सदस्य सचिन मस्के यांच्या अत्यंत देखण्या नियोजनात काढण्यात आली .
या भव्य मिरवणुकीत अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ देखावा , भगवान बुद्ध धम्मदेसना शिबीर देखावा , डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि रमामाता आंबेडकर या आजारी असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची समजूत काढत असतानाचा भावनिक देखावा ,भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभ देखावा यासोबतच भारत देशातील महान समाज सुधारक महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, शेर ए हिंद टिपू सुलतान ,महात्मा फुले ,साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे , राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिकृती मिरवणुकीत सामील करण्यात आल्या होत्या ...
या मिरवणूकीत हजारो युवक युवती आबालवृद्ध सामील झाले होते. प्रत्येकांनी मिरवणुकीतील देखाव्याचे कौतुक केले ..
या मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी व्ही एस पँथर्स चे सं अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष तथा मनपा सदस्य सचिन मस्के ,संपर्क प्रमुख आनंद जाधव ,अमोल सुरवसे, जिल्हाध्यक्ष बालाजी बनसोडे,अमोल कांबळे, प्रतिक कांबळे, सूरज सूर्यवंशी , किरण पायाळ , असद शेख , बुद्धा भालेराव ,संतोष मांदळे, अतुल कदम , रवि कुरील सह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले ...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने