सचिन दाने यांना सेवागौरव पुरस्कार जाहीर

  सचिन दाने यांना सेवागौरव पुरस्कार जाहीर


     लातूर/प्रतिनिधी:लातूर ग्रामीणमध्ये शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी,युवकांसाठी अविरत कार्य करणारे,शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख तसेच रणझुंजार प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन दाने यांना सामाजिक तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केल्याबद्दल २०२३ चा सेवागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
हुतात्मा स्मृती मंदिर,सोलापूर येथे दि.१० एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता पुरस्काराचे वितरण होणार आहे.
    शिवव्याख्याते,शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते दाने यांना पुरस्कार दिला जाणार आहे.सोलापूर येथील उद्योजक,नामवंत  समाजसेवक स्व.वीरभद्र बस्वंती यांच्या स्मरणार्थ,विविध क्षेत्रात समाजासाठी समर्पित भावनेतून लोकाभिमुख सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा सेवागौरव पुरस्कार दिला जातो.सचिन दाने यांनी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलने केली.कोरोना काळात मोठे काम केले.दुष्काळात जलसंवर्धनाचे काम,सामुदायिक विवाह सोहळे, शिवजयंती,वृक्षारोपण,आरोग्य शिबीर,कुस्ती स्पर्धा असे विविध समाजोपयोगी कार्य केले आहे.
    लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकरी पीकविमा क्रांती आंदोलनामुळे एक आश्वासक शेतकरी युवा नेता म्हणून
त्यांच्याकडे पाहिले जाते.
    हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दाने यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने