राष्ट्रीय लोक अदालत न्यायालयातील प्रलंबीत खटले सामोपचाराने मिटवावेत -प्रमुख जिल्हा न्यायाधीश

 राष्ट्रीय लोक अदालत न्यायालयातील प्रलंबीत खटले सामोपचाराने मिटवावेत

-प्रमुख जिल्हा न्यायाधीश

 

        उस्मानाबाद- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि राज्य विधी सेवा सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली आहे.

        न्यायालयीन प्रलंबित, तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये झटपट न्यायनिर्णय व्हावेत, या उद्देशाने येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने दि.30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वा. येथील जिल्हा न्यायालय येथे व सर्व तालुका न्यायालयात "राष्ट्रीय लोक अदालतीचे " आयोजन केले आहे.

          या लोक अदालतीमध्ये दिवाणी प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी खटले, मोटार अपघात प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, धनादेशाचे प्रकरणे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग उस्मानाबाद येथील तडजोडीस पात्र प्रलंबित प्रकरणे तसेच मोटारवाहन  नियम भंगाची वाहतुक शाखेची दाखल पूर्व प्रकरणे समेटासाठी पक्षकारांनी पुढे यावे व लोक अदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंजू एस. शेंडे आणि वरिष्ठ न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वसंत यादव यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने