दत्तात्रय चांबारगे (माळी) यांना पंचसूत्री पुरस्कार जाहीर

दत्तात्रय चांबारगे (माळी) यांना पंचसूत्री पुरस्कार जाहीर
लातूर :- श्री दत्तात्रय किसनराव चांबारगे (माळी) यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत भारत विकास परिषद, शाखा लातूर च्या वतीने त्यांची 
"पंचसूत्री" पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. भारत विकास परिषद ही राष्ट्रीय पातळीवरील संघ परिवारातील कार्य करणारी एक सामाजिक संघटना आहे.
या संघटनेच्या वतीने संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा व समर्पण या पंचसूत्रिवर आधारित कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येत आहेत.लातूर शाखेत असलेल्या पदाधिकारी यांनी सर्वानुमते या वर्षी पासून सुरु केलेला पहिला पंचसूत्री पुरस्कार दत्तात्रय चांबारगे - माळी यांना जाहीर केला आहे. याचे वितरण दि. 21 मे रोजी सायंकाळी 6 वाजता दयानंद सभागृह लातूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
   वृत्तपत्र वाटप करून जीवन जगत असताना आपण ही समाजाचे काही तरी देण लागतो या सामाजिक भावनेतून समाजाची सेवा करावी या हेतूने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय लातूर येथील रूग्णांच्या नातेवाईकास मदत व्हावी या उद्देशाने "मोफत अन्नसेवा योजना " हा सामाजिक उपक्रम त्यांच्या व त्यांच्या सोबत काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या वतीने सुरु करण्यात आला.रुग्णालयात आलेले रुग्णाचे नातेवाईक यांना दररोज सायंकाळी 7 वाजता अन्नसेवा योजने च्या माध्यमातून 100 ते 125 रूग्णांच्या नातेवाईकास दोन चपाती, सुकी भाजी व खिचडी दिली जाते.
   बाहेरगावाहून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय लातूर येथे दाखल रूग्ण व त्यांच्या नातेवाईकास मदत करूण अडचणीच्या काळात येथील रूग्णांच्या नातेवाईकास सहकार्य करावे ही अपेक्षा बाळगून हा उपक्रम कायम सुरु रहावा ही भावना रूग्णालयात येणा-या रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांची आहे.त्यामुळे या सामाजिक उपक्रमात गहु, तेल, तांदूळ, आर्थिक सहाय्य (01दिवसासाठी मात्र रू.2500/-) देवून सहभागी होवून दानशूर लातूरकरांनी सहाय्य करावे असे आवाहन त्यांनी केले आणि आपल्या लातूर करांनी याला भरभरून प्रतिसाद दिला आणि ही अन्नसेवा योजना 26 जानेवारी 2016 पासून आजतगायत सुरु आहे. आज या योजेनेला सात वर्ष 03 महिने 20 दिवस पुर्ण झाले.या सामाजिक उपक्रमात आजपर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या पत्रकार, पोलीस, डॉक्टर, सामाजिक, राजकीय तसेच सर्व सामान्य दानशूर व्यक्ती, संस्था यांनी वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी, विशेषदिवस निमित्त यात सहभागी होत सहकार्य केलेले आहे.आज त्यांनी सुरु केलेला लातूर मधील अन्नसेवा योजने चा उपक्रम अनेक सामाजिक संस्था वेगवेगळ्या ठिकाणी राबवत आहेत, आज लातुरात अन्नसेवा ही एक चळवळ झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने