दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्डचे वितरण

 दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्डचे वितरण


 

लातूर:पत्ता बदलल्यामुळे किंवा चुकल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांचे वैश्विक कार्ड (युडीआयडी कार्ड) पोस्ट ऑफिसमधून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परत येत होते. त्यामुळे दिव्यांग बांधवांची होणारी गैरसोय लक्षात घेवून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली युडीआयडी कार्डचे वितरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, समाज कल्याण विभाग आणि विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा समाज कल्याण अधिकारी  संतोष नाईकवाडी, राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे बसवराज पैके, परमेश्वर सोनवणे, मानसोपचार तज्ज्ञ नवाज शेख, विषय शिक्षक बालासाहेब गंगणे, कर्मचारी व दिव्यांग बांधव, त्यांचे पालक यावेळी उपस्थित होते.

युडीआयडी कार्ड तयार असूनही चुकीचा किंवा बदलेल्या पत्त्यामुळे ते दिव्यांग बांधवांपर्यंत पोहचू शकत नव्हते. त्यामुळे विविध योजनांपासून दिव्यांग बांधव वंचित राहत असल्याची बाब जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या लक्षात आल्यानंतर युडीआयडी कार्ड वितरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने