इंदरठाणा येथे सर्वसोयींनीयुक्त शादीखाना बांधून देणार इंदरठाणा येथील विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी यांची घोषणा

 इंदरठाणा येथे सर्वसोयींनीयुक्त शादीखाना बांधून देणार

इंदरठाणा येथील विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी यांची घोषणा

          

लातूर – प्रत्येक निवडणुकीत भाजपाला साथ आणि समर्थन देणाऱ्या इंदरठाणा गावच्या विकासासाठी निधीची कसलीही कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देऊन इंदरठाणा येथील महादेव मंदिर परिसरात सभागृह आणि मुस्लिम बांधवांसाठी शासनाच्या योजनेतून सर्व सोयीने युक्त शादीखाना बांधून देणार असल्याची घोषणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केली.

रेणापूर तालुक्यातील मौजे इंदरठाणा येथील ७१ लक्ष ५० हजार रुपये खर्चाच्या आमदार निधीतून ५ लक्ष रुपये खर्चाच्या गावाअंतर्गत विद्युतीकरणाचा शुभारंभ१० लाख रुपयाचे इंदरठाणा - सांगवी रस्ता मजबुतीकरण आणि डांबरीकरण१० लक्ष रुपयाचे इंदरठाणा - आरजखेडा रस्ता मजबुतीकरण३० लक्ष रुपये खर्चाचे इंदरठाणा - आरजखेडा रस्त्याचे डांबरीकरणइंदरठाणा गावातील पटवारी गल्लीत ५ लक्ष रुपये खर्चाचे पेवर ब्लॉकइंदरठाणा येथील दलित वस्तीत ८ लक्ष रुपयांची विविध विकास कामे आणि जिल्हा परिषद शाळा परिसरात ३.५ लाख रुपयांचे पेवर ब्लॉक आदी विविध विकास कामाचा शुभारंभ शुक्रवार दि २६ मे २०२३ रोजी सायंकाळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड आणि जिल्ह्याचे खा. सुधाकर शृंगारे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहाच्या वातावरणात करण्यात आला. यावेळी बोलताना आ. कराड यांनी वरील घोषणा केली.

या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदेतालुका अध्यक्ष अ‍ॅड. दशरथ सरवदेसंगायोचे अध्यक्ष वसंत करमुडेप्रदेश भाजपाचे सतिष आंबेकरश्रीकृष्ण पवारदर्जी बोरगावचे सरपंच रमेश कटकेशेख निजामआरजखेडा येथील उपसरपंच भालचंद्र सूर्यवंशीइंदरठाणा येथील कल्याण मजूर संस्थेचे चेअरमन सय्यद वाजिद सालारसाबसरपंच अविनाश रणदिवेउपसरपंच इब्राहिम सय्यद, सय्यद गफूरभगवान बैरागीकबीर जोगदंडअलीम सय्यद यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामस्थांनी वाजत गाजत फटाक्याची आतिषबाजी करून मोठ्या जल्लोषात आ. कराड आणि खा. शृंगारे यांचे स्वागत केले.

कोणत्याही कार्यक्रमात स्व. सालारभाई पटेल यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. सालारभाई पटेल यांनी कार्यक्रम कुठेही असला तरी भला मोठा पुष्पहार घालून स्वागत करण्याची परंपरा लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांपासून जपली. हीच परंपरा सालारभाई यांचे चिरंजीव वाजीद पटेल पुढे कायम ठेवली असल्याचे गौरव उद्गार काढून यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले कीऐंशी टक्के मुस्लीम बांधवांची संख्या असलेले इंदरठाणा हे गाव मुंढे साहेबांना मोठा आशिर्वाद देणारे आहे. या गावातील वाढती लोकसंख्या लक्षात घेवून मुस्लिम बांधवांसाठी शासनाच्या योजनेतून सर्व सोयीनीयुक्त शादीखाना बांधून देणार त्याचबरोबर महादेव मंदिर परिसरात दसर्‍यापूर्वी सभागृह पूर्ण होईल. इंदरठाणा ते नागझरी आणि दर्जीबोरगाव ते इंदरठाणा या दोन्ही रस्त्याचे काम तात्काळ व्हावे यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार असून येत्या वर्षभरात इंदरठाणा गावच्या विकासाचे एकही काम शिल्लक ठेवणार नाही असे त्यांनी बोलून दाखविले.

  पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने आणि मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने गोरगरीब सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना सुरु केल्या. त्या योजनांचा लाभ विविध जाती धर्मातील लाखो, करोडो गरजू लाभार्थ्यांना मिळाला. हा लाभ देताना कुठलाच भेदभाव केला नाही. असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले कीआजपर्यंत काँग्रेस वाल्यांनी जातीयतेचे वीष पेरून समाजा-समाजात तेढ निर्माण केला. याची जाणीव मुस्लीम बांधवांना आज होवू लागली असल्याने उत्तर प्रदेशात बहुतांशी मुस्लीम बांधव आज भाजपा सोबत पर्यायाने विकासाच्या पाठीशी उभे आहेत.

           माझी कोणाचीही प्रत्यक्ष ओळख नसतानाही आपण मला मताधिक्य देवून लोकसभेत पाठविले हे केवळ रमेशआप्पांच्या कार्यामूळेच होवू शकले. गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या सतत सुख-दु:खात सहभागी होणारे रमेशअप्पा कराड हे येणार्‍या काळात लातूर ग्रामीणचे आमदार व्हावेत यासाठी आपण त्यांना भरभरुन आशिर्वाद द्यावेत असे सांगून यावेळी खा. सुधाकर शृंगारे म्हणाले की इंदरठाणा बहुसंख्य मुस्लीम बांधवांचे गाव असले तरी या गावच्या ग्रामपंचायतीवर भाजपा झेंडा फडकला ही बाब अत्यंत गौरवास्पद आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी विविध योजना सुरू केल्या असल्याचे सांगून विविध योजनांची माहिती दिली.

          भाजपाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दशरथ सरवदे यांनी लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावात रमेशअप्पा कराड यांनी आपल्या आमदार निधीतून आणि शासनाच्या विविध योजनेतून लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याने विकासाची अनेक कामे मोठ्या प्रमाणात होत असल्याचे बोलून दाखविले. रेणापूर तालुका भाजपाच्या सरचिटणीसपदी अमर वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल तसेच रेल्वे बोर्डाच्या सल्लागार समितीवर शेख निजाम यांची फेर निवड झाल्याबद्दल आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत कातळे यांनी केले तर प्रारंभी सरपंच अविनाश रणदिवे यांनी प्रस्तावीक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने