चाकूर येथे एकविसावा सामूहिक विवाह सोहळा
चाकूर : प्रतिनिधी-येथील बालाजी पाटील मित्र मंडळ आयोजित २१ वा सर्वधर्मीय सामूहीक विवाह सोहळा दि.२५ मे रोजी जि.प.शाळेच्या प्रांगणात उत्साहात झाला. या सोहळ्यात १५ जोडपी विवाहबध्द झाले. रितीरिवाजा प्रमाणे बौद्ध-ंिहदु पध्दतीने विवाह लावण्यात आले. जि.प.शाळेतील प्रांगणात सनई, चौघडी, वाजंत्री आणि मंगल वाद्यांचा निनाद, सदाबहार गीतांनी सोहळ्यात रंगत आणली. फटाक्यांची आतिषबाजी, प्रतिष्ठीत मान्यवरांचा आशीर्वाद आणि आयोजकासह कार्यकर्तांची धावपळ, जेवणाची लज्जदार मेजवानी असा सगळा शाही सामुहीक लग्न सोहळा पाहुन वधू वरांच्या आईवडिल, नातेवाईकांसह व-हाडी मंडळीचे डोळे दिपले. यावेळी माजी खासदार सुनिल गायकवाड, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील ,माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपा नेते दिलीपराव देशमुख, चेअरमन विठ्ठलराव माकणे, नगराध्यक्ष कपील माकणे, सभापती निळकंठ मिरकले, रोहिदास वाघमारे, सज्जन लोनावळे आदी विविध क्षेत्रातील व पंचक्रोशीतील मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मित्र मंडळाचे बालाजी पाटील चाकूरकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी वधु-वरांना शुभेच्छा दिल्या तसेच समाजातील उपेक्षित,निराधार, गरीब,गरजु अशा मुला-मुलींचे विवाह सोहळे आगामी काळात व्हायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली. हा विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गजानन करेवाड, युवराज आगरकर, बाळू कांबळे, शरद आळे, विशाल सुवर्णकार, ज्योतीराम लोखंडे, रंजीत भोसले, चेतन महांिलगे, सतिष साबणे, बबलु काथवटे, अमित पाटील, गोपाळ साखरे, प्रविण सूर्यवंशी शिवम रुपनर पाटील गणेश सांळुके आदी मित्रमंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थाचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा