महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत निर्मल सुराना यांनी केला औसा मतदारसंघाचा दौरा

महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत निर्मल सुराना यांनी केला औसा मतदारसंघाचा दौरा

पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद, विकास कामांची केली पाहणी



औसा - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने भाजपने देशभरात महिनाभर महाजनसंपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.या अनुषंगाने (दि.११) रोजी औसा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे कर्नाटक प्रदेश उपाध्यक्ष निर्मल सुराना यांनी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी औसा मतदारसंघातील फळबाग लागवड, सिंचन विहीर निर्मिती, बसस्थानक इ. विकासकामांची पाहणी केली आणि भाजप पदाधिकाऱ्यांशी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

                      निर्मल सुराना यांनी या दौऱ्यात औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांच्या निवासस्थानी मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मागच्या ९ वर्षांमध्ये घेतलेल्या जनकल्याणकारी निर्णयांची व आणलेल्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देत सरकारने केलेले कामांची माहिती लोकांपर्यंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोहोचवली पाहिजे अशा सूचना केल्या. या भेटीत त्यांनी औसा व उजनी येथील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरी भेटी दिल्या. करजगाव याठिकाणी सिंचन विहीरीची पाहाणी केली तसेच आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने उभारलेल्या लामजना येथील सुसज्ज बस स्थानकाची पाहाणी केली. याचबरोबर आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतील मनरेगातून ग्रामसमृद्धी या अभियानाअंतर्गत ताबंरवाडी येथील सिंचन विहीर व फळबागेची पाहाणी केली व आमदार अभिमन्यू पवार यांच्या कामाचे कौतुक केले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता,शहराध्यक्ष लहू कांबळे,औसा नगरपरिषदेचे माजी गटनेते सुनील उटगे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेखर सोनवणे, सुशीलदादा बाजपाई, अॅड अरविंद कुलकर्णी, अॅड मुक्तेश्वर वागदरे, कंटिअण्णा मुळे, धनराज परसणे,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन आनसरवाडे, एकनाथ बनसोडे, श्रीमंत मोरे, माधवसिंह परिहार,भाजपचे तालुका सरचिटणीस संजय कुलकर्णी, गंगाभिषण भंडारी, डॉ रूद्र धाराशिवे, सुरेश स्वामी, नारायण माळी, हिमायत पटेल, संदिपान जाधव, शिवरूद्र मुरगे, प्रवीण कोपरकर, चंद्रकांत ढवण, मधुकर रंधवे,राधाकृष्ण जाधव, अॅड श्रीधर जाधव, सिद्धांत भेटेकर, शिवशंकर पाटील, सचिन कांबळे, नितीन कवठाळे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने