रामनाथ विद्यालयात नवोदित प्रवेश विद्यार्थ्यांचे स्वागत

 रामनाथ विद्यालयात नवोदित प्रवेश विद्यार्थ्यांचे स्वागत
 आलमला / प्रतिनिधी-श्री रामनाथ मा. व उच्च माध्यमिक विद्यालय अलमला तालुका औसा येथे पाचवी ते बारावी मध्ये नवीन  प्रवेश घेतलेल्या व सर्व विद्यालयातील जुन्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्याच दिवशी दिनांक 15 जून 2023 रोजी विद्यालयामध्ये गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे पुस्तके वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रभाकर कापसे हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून  पालक प्रतिनिधी श्री उमाशंकर बिराजदार मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील उपस्थित होत्या .  पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रभाकर कापसे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या याही वर्षी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपली विद्यालयाची गुणवत्ता टिकवावी असे आव्हान सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना  केले या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री पी सी पाटील विद्यालयातील एमसीवीसी विभागाचे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने