माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कडून पाटील परिवाराचे सांत्वन

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कडून पाटील परिवाराचे सांत्वन

लातूर /प्रतिनिधी- तालुक्यातील बाभळगाव येथील जेष्ठ नागरिक तथा माजी पोलीस पाटील दिवंगत लिंबराज पाटील वय वर्ष ९१ यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले होते  पाटील परिवारातील कुटुंबाची बाभळगाव येथे  राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी भेट घेवून कुटुंबातील सदस्य  रघुनाथराव पाटील, मुकुंदराव पाटील यांची भेट घेऊन सांत्वन केले.
 यावेळी साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, लालासाहेब मुळे, तंटामुक्ती अध्यक्ष जीवनराव देशमुख, संतोष देशमुख, उपसरपंच गोविंद देशमुख, पोलीस पाटील मुक्ताराम पिटले ,सरपंच प्रतिनिधी सचिन मस्के, अकबर शेख अविनाश देशमुख, सुधाकर जोशी, अविनाश देशमुख रमेश देशमुख, युवराज पाटील शिवराज पाटील, ओम पाटील, तानाजी पाटील,बाळासाहेब पाटील, इंद्रजित पाटील, लतिफ सय्यद, निहार पाटील, पारस पाटील आदि उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने