औसा (प्रतिनिधी ) महाराष्ट्रभर १० वी माध्यमिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला . हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित ज्ञानसागर विद्यालय हासेगाव या विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवत १० वी चा निकाल १०० % लागला . विद्यालयातून कु.गोडकर केदार पुरुषोत्तम यांनी ९१. ०० % गुण मिळवून लोदगा केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवला , कु. राठोड अभिषेक संजय यांनी ९० . ०० % गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर कु कादरी मुस्कान सिराजद्दीन यांने ८९. ०० % गुण मिळवून तृतीय क्रमांक, पटकावला असून या शैक्षणिक वर्षात विद्यालयातील एकूण ५० विद्यार्थी १० वी परीक्षेस बसले होते विद्यालयातील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व ०८ विदयार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शॉल श्रीफळ आणि पुस्पगुचे देऊन मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला . सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, श्री भीमाशंकर आप्पा बावगे, उपाध्यक्षा सौ जयदेवी बावगे, सचिव श्री वेताळेश्वर बावगे, कोष्याध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे, संचालक श्री आत्माराम मुलगे, श्री ज्ञानसागर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कालिदास गोरे,कुटवाड जी ,पाटील डी ,बावगे एस , मुपडे ए ,लांडगे ए , कोकाटे एस के . `लातूर कॉलेज ऑफ फ़िजिओथेरेपी, हासेगाव लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटेकनिक लातूर कॉलेज ऑफ आय टी आय ,गुरुनाथअप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल सर्व युनिट चे प्राचार्य , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हासेगाव ज्ञानसागर विद्यालयाचा १०० % निकाल
www.swaranpushp.com
0
टिप्पणी पोस्ट करा