भाजपची जुलमी निजामी राजवट व तुघलकी कारभार-डाॅ.अफसर शेख,जिल्हा कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी

भाजपची जुलमी निजामी राजवट व तुघलकी कारभार-डाॅ.अफसर शेख,जिल्हा कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी
 औसा/प्रतिनिधी-शहरात भाजप नेते आ.अभिमन्यु पवार यांच्या शुभहस्ते  व भाजप गटनेते, भाजप माजी नगरसेवक व  भाजप पदाधिकारी उपस्थीतीत दि 22.05.2023 रोजी औसा येथे औसा नप अंतर्गत कर सर्व्हेचा शुभारंभ करण्यात आला, ज्याचा जाहीर निषेध राष्ट्रवादी तर्फे करण्यात येत आहे.यासाठी आंदोलन व मोर्चाची भुमिका माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.अफसर शेख  यानी जाहीर केली आहे.त्यांच्या वतीने सादर करणयात आलेल्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत.1) कोरोना,अतीवृष्टी आदी कारणामुळे व व्यापार मंदावल्यामुळे, आर्थिक परिस्थीती बिघडल्याने औसा शहरातील घरपट्टी व नळपट्टीचा जलद गतीने झालेला व सुरु असलेला ड्रोन व जी पी एस सर्व्हे रद्द किवा स्थगित करावा.घरपट्टी व नळपट्टीत चौपटीने वाढ होणार आहे (उदा- 2000 ची घरपट्टी 10,000 होईल).या अत्याधुनिक सर्व्हेसाठी पालिकेने केला 50 लक्ष खर्च, तुमची  1 इंच जागा ही  विना टॅक्स शिवाय राहणार नाही,राष्ट्रवादीने गेल्या 5 वर्षाच्या सत्तेच्या  काळात 1₹ ही टॅकस वाढ केली नाही.
2) औसा शहरास कोटयावधीची  माकणी योजना व उटी योजना असुन ही भाजप शासीत न प च्या ढिसाळ नियोजनाने 15 ते 20 दिवसाआड पाणीपुरवठा होतो तसेच बोरवेलची दुरुस्ती होत नाही तरी नियमित 3 दिवसाआड पाणीपुरवठा करावा व नादुरुस्त बोरवेलची दुरुसती व बोरवेल ला लाईट कनेक्शन दयावे, नळपट्टी अभावी नळ कनेकशन तोडु नये3) गेल्या वर्षभरापासुन शहरा मधे पोलवरील लाईट दुरुस्ती न झाल्याने सर्वत्र  वार्डात अंधार पसरला आहे, त्वरीत लाईट दुरुस्ती करुन घ्यावी.4) नगर पालिका कार्यालयातील जनतेच्या विविध कार्यालयीन प्रमाणपत्र साठी लागणारे हेलपाटे, चकरा, लाचखोरी बंद करावी तसेच विविध नोंदणी साठी गुत्ता पद्धतीने दयावी लागत असलेली लाचखोरी मोडीत काढावी.5) घनकचरा वर प्रक्रिया करण्यासाठी म्हणजेच शहरातुन जमा होणा-या कचरयाची विल्हेवाट लावण्यासाठी शोधुन काढलेला नवा आस्मानी कर - उपयोगिता कर 180+180 =  360 ₹ त्वरित रद्द करावा.6) औसा नवीन डेपो येथील बस स्टॅड हा शहरातील जुन्या वस्तीसाठी दुर होतो, वार्ड क्र 8, 7, 6, 1व 2 मधील नागरिकाना होणारा त्रास, पायपीट, आर्थिक भुर्दंड  व झालेला अन्याय ST महामंडळाने  दुर करावा.तसेच औसा बस डेपो येथे होत असलेले नवीन बस स्टँड मुख्य शहरा पासून दूर होत आहे या नवीन बस स्टँड मुळे औसा शहराचे दोन भाग होतील एक जुना औसा व एक नवीन औसा व सद्या अस्तित्त्वात असलेली मुख्य बाजार लाईन ही पूर्ण पणे बंद होईल व अर्ध्या मुख्य शहरातील मालमत्तेचे दर एकदम कमी होतील
तसेच राष्ट्रवादी ने औसा भाजपचा निषेध करताना असेही म्हटंले आहे की, तुगलक राजा ने जसे एकाकी दिल्ली येथील राजधानी हलवुन दौलताबाद येथे आणली व दिल्लीचे महत्व कमी केले तसे, औसा शहरात भाजपने  'तुगलकी फरमान' काढून बस स्टँड हे वरील भागात डेपो येथे घेऊन जात आहे व अर्ध्या औश्याचे शहराचे महत्व कमी करत आहे, सदरील औसा भाजपचे हे कृत्य हे 'निजामी' असुन नगर पालिकेत भाजपच्या देखरेखीखाली कारभार हाकला जात आहे व जनतेच्या मुलभुत प्रश्नाकडे डोळेझाक केली जात आहे.असे डॉ.अफसर शेख यांनी म्हटले आहे.

Post a Comment

أحدث أقدم