शेतरस्त्यासाठी आज पाखरसांगवीची ग्रामसभा बांधावरच झाली

 शेतरस्त्यासाठी आज पाखरसांगवीची ग्रामसभा बांधावरच  झाली 


पाखरसांगावी / प्रतिनिधी ः लातूर तालुक्यातील पाखरसांगवी ग्रामपंचायतीचे नावीण्यपूर्ण उपक्रम हे सतत चर्चेचे आणि लक्षवेधी असतात. तसाच विषय आज आणखी चर्चेचा आणि लक्षवेधी ठरणारा आहे. कारण पाखरसांगवीसह जवळपास प्रत्येक गावाला भेडसावणारा शेतरस्त्याचा विषय हा वादग्रस्त सुध्दा असल्याने, तो सर्वांना विश्वासत घेऊन मार्गी लावने गरजेचे असते. त्यामुळे पाखरसांगवीचे लोकनियुक्त सरपंच भिमाशंकर (राजाभाऊ) लखादिवे व सर्व सदस्सांनी पुढाकार घेऊन तो शेतरस्त्याचा किचकट असणारा विषय सर्वानुमते व समन्वयाने सोडवण्यासाठी अक्षरशः ग्रामसभाच वादग्रस्त असलेल्या शेतकर्‍याच्या बांधावरच घेतली आहे.
यासाठी सरपंचांनी सर्व शेतकर्‍यांसह लोकनियुक्त ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी जसे क जसे की, ग्रामसेवक आणि तलाठी हे देखील हिरीरीने उपस्थित होते. या ठिकाणी शेतकर्‍यांना रस्ता उपलब्ध नसल्याने किंवा सबंधीत शेतकर्‍यांनी तो अडवल्याने यावर मार्ग काढणे नितांत गरजेचे होते. या रस्त्यामुळे पुढील शेतकर्‍यांना मोठा त्रास होत असल्याने त्यावर चर्चा होणे आणि मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व तलाठीसह सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी यावर चर्चा करुन तहसीलदारांसह जिल्हाधिकारी आणि संबंधीत अधिकार्‍यांकडून हा प्रश्‍न मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने