वात्सल्यमूर्ती: श्रीमती रत्ना पांचाळ मॅडम

वात्सल्यमूर्ती: श्रीमती रत्ना पांचाळ मॅडम

*"लावियेला दीप प्रेमे*
*तेवता ठेवू चला...!*
*बालकांच्या उन्नतीचा* 
*मार्ग हा चालू चला....!!*
       
       वरील काव्यपंक्तीप्रमाणे ज्यांनी आपले अख्खे जीवन ज्ञानदानाच्या पवित्र कार्याने उजळून काढले, एक ध्येयनिष्ट,कर्तव्यदक्ष..
मातृहृदयी, प्रेमळ,लळा जिव्हाळा ज्यांच्या नसानसांत भरून आजही वाहतो त्या थोर ज्ञानाच्या उपासक... विद्यार्थीप्रिय शिक्षण क्षेत्रातील एक व्यासंगी... तरीही अतिशय नम्र,मितभाषी, अभिरुचीसंपन्न...  उत्साही... बहुआयामी... मातृहृदयी व्यक्तीमत्व, ज्यांनी गेली अडतीस वर्षे शिक्षण क्षेत्रात अविरतसेवा दिली त्या श्रीमती रत्नमाला सोपान पांचाळ मॅडम ! 
      ज्यांनी कें.जि.प.प्रा.शा. आलमला येथून दि.२३ फेब्रूवारी १९८५ पासून शिक्षणसेवेची सुरुवात केली. पूढे प्रा.शा.अपचुंदा,प्रा.शा. शिंदेवाडी, प्रा.शा.उटी(बु),कें.प्रा.शा.औराद(शहा.) आणि प्रशाला जावळी..
येथे कार्य करून आज दि.३० जुन २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.  
          मॅडमचे काम पाहता त्या कुठलेही कार्य अत्यंत आवडीने आणि वेळेत पूर्ण करतात. कर्म हाच धर्म समजून त्यांनी आपले कार्य केलेले आहे.  
           कमलपुष्पाच्या एकेक पाकळ्या उमलाव्यात आणि त्याचे सुंदर सुगंधी फुल व्हावे अगदी तसेच प्रा. शा. जावळी येथील त्यांच्या अल्पशा सहवासात मला त्यांच्या विविध पैलुंचा  मोठा परिचय झाला.त्यांचा सहवास मला लाभला हे मी माझे भाग्य समजते
           *आदर्श आई कशी असावी,*
*त्याचबरोबर आदर्श शिक्षिका कशी असावी,*
*सुगृहीणी,कुटुंबवत्सल कसे बनावे,*
*सुंदर रांगोळी कशी रेखाटावी*
*सुखदु:खाची रंगसंगती कशी साधावी*
*टॉपटीप/निटनेटके पण  सरळ साधे आणि प्रामाणिक कसे राहावे,*
*उत्तम सयंपाक कसा करावा,*
*मेहंदीची नक्षी कशी काढावी,*
*वेळेचे ,पैशाचे नियोजन कसे करावे,*
*दृकश्राव्य स्वरुपातील क्षैक्षणिक साधनांचे सादरीकरण  कसे करावे,*
*नवनिर्मिती/सृजन कसे करावे,*
*अध्ययन/अध्यापन कौशल्य विकसन कसे करावे,*
*एक उत्तम उपक्रम संकल्पक कसा असावा,*
*शालेय पोषण आहाराचा लेखाजोखा कसा सांभाळावा....हे आणि * 
*समाजातील समस्याग्रस्त व्यक्तींची अडचण समजून त्यांना मदत करणं हाच त्यांचा ध्यास राहिलेला आहे.*
*विद्यार्थीप्रिय,समाजप्रिय,निसर्गप्रेमी*  
*विशेषतः मुलींविषयीची तळमळ ... जणू आजच्या काळातील खरीखुरी सावित्रीबाईच!*
         या आणि अशा कितीतरी गोष्टी मॅडमच्या सहवासातुन शिकायला मिळाल्या,अनुकरणीय वाटल्या!
          त्यांचा विदयाव्यासंग फार दांडगा आहे.शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान फार मोठे आहे. शासनाने या कार्याची दखल घेवून त्यांना *आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविले आहे* 
        वयाच्या ५८ व्या वर्षी नोकरीतुन सेवानिवृत्त होतानाही  विद्यार्थ्यांसाठीची तीच धडपड,तेच प्रेम,तेच चैतन्य तोच उत्साह ,तोच आनंद आजही तसाच टिकून आहे. 
         त्यांचे हे सेवानिवृत्ती नंतरचे नवे आयुष्य असेच आनंदी सुखी समाधानी, उत्साही आणि विशेषतः निरोगी निरामय जावो या आत्मिय शुभेच्छा !!

शब्दांकन:-भारत कांबळे,औसा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने