जलजीवन मिशन ची कामे दर्जेदार करून वेळेवर पूर्ण करा – खा. सुधाकर शृंगारे

 जलजीवन मिशन ची कामे दर्जेदार करून वेळेवर पूर्ण करा – खा. सुधाकर शृंगारे

 

लातूर- लोकसभा मतदार संघामध्ये जवळपास २३८० कोटी रुपयांची जलजीवन मिशन या कल्याणकारी योजनांची कामे सुरू असून या माध्यमातून जवळपास ३ लाख ३० हजार कुटुंबांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणार असून ही सर्व कामे दर्जेदार करून वेळेवर पूर्ण करा असे खा. सुधाकर शृंगारे यांनी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी सांगितले. दिनांक 24 जून रोजी अहमदपूर तालुक्यातील मौजे काळेगाव, अंधोरी, मानखेड आणि काजळ हिप्परगा या गावातील जलजीवन मिशन च्या कामांचे उद्घाटन काल दिनांक 24 जून रोजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते माजी मंत्री तथा अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. विनायकराव जी पाटील यांच्या समवेत पार पडलेया प्रसंगी खासदार श्री. सुधाकर शृंगारे बोलत होते.

          अहमदपूर तालुक्यातील मौजे काळेगाव येथील खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत झालेल्या ३० लाख रु. च्या काळेगाव गावातील बुद्ध विहाराकडे जाणारा सिमेंट रस्त्याचे लोकार्पणतालुक्यातील मौजे अंधोरी येथील ४ कोटी ३६ लक्ष रु.च्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे उद्घाटन, तालुक्यातील मौजे माणखेड येथे 63 लक्षशिवणखेड येथे 42 लक्ष आणि पाटोदा येथील 47 लक्ष रु. च्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे उद्घाटनकाजळ हिप्परगा येथील 21.65 लक्ष रू. जलजीवन मिशन च्या कामाचे उद्‌घाटन काल खासदार श्री. सुधाकर शृंगारे यांनी केले.

          या प्रसंगी बोलतानातालुक्यातील मौजे काळेगाव येथे टेकडीवर वसलेल्या बुद्ध विहाराच्या विविध विकासकामासाठी आम्ही सर्व जन सदैव कटिबद्ध असून या बुद्ध विहाराच्या सर्वांगीण विकासासाठी जेजे काही लागेल ते मी मंजूर करून आणतो असे सांगून गावकऱ्यांना आश्वस्त केले. तसेच या बुद्ध विहाराची दर्जोन्नती करून त्यास गट ब किंवा गट क दर्जा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करतो असे ही खासदार श्री. सुधाकर शृंगारे यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील मन्याड नदीवरील आनंदवाडी ते सुनेगाव (शेंद्री) या गावांना जोडणारा पूल अत्यंत दुरावस्थेत असून या पुलाच्या दुरुस्तीसाठी देखील आम्ही सर्वजन प्रयत्नशील असल्याचे खा. शृंगारे यांनी सांगितले.

          पुढे बोलतानादेशामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र जी मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकाने नुकतेच ९ वर्ष पूर्ण केले असून या ९ वर्षामध्ये त्यांच्या आणि भारतीय जनता पार्टी सरकारसह केंद्र सरकारच्या माध्यमातून देशासह जिल्हाभरामध्ये अनेक कल्याणकारी योजना आणि प्रकल्प उदयास आलेले असून यामाध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे ही खासदार श्री.शृंगारे यांनी सांगितले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, जन धन योजना, आयुष्यमान भारत योजना यांसारख्या कल्याणकारी योजनांमुळे देशभरात आर्थिक समानतेस वेग आलेला आहे.

          याप्रसंगी खासदार श्री. सुधाकर शृंगारे यांच्यासह माजी मंत्री तथा अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. विनायकराव पाटील जीभाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. भाग्यश्री क्षीरसागरमाजी नगराध्यक्ष श्री. भारत चामेश्री. कमलाकर पाटीलश्री. बालाजी गुट्टे, श्री. राहुल शिवपूजे, श्री. निळकंठ मीरकले, श्री. शिवाजीराव बैनगिरे, श्री. सिद्धार्थ सूर्यवंशी, श्री. प्रशांत पाटील, श्री. परमेश्वर घोगरे, श्री. गोविंद गिरी, श्री. प्रशांत पाटील, सरपंच सौ. प्रफुल्लाताई नारागुडे यांच्यासह कार्यकारी अभियंता श्री. शेलार जी, उपअभियंता श्री. धनंजय मुळे, नायब तहसीलदार श्री. दंताळे साहेब, गटविकास अधिकारी श्री. अमोल आंदेलवाड यांचासह जिल्ह्यासह तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारीनागरिक आणि गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने