श्री केशव शिशुवाटिकेत आषाढीनिमित्त बालदिंडी

 श्री केशव शिशुवाटिकेत आषाढीनिमित्त बालदिंडी 


    लातूर/प्रतिनिधी: आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील श्री केशव शिशुवाटिकेत शनिवारी (दि.१ जुलै) बालदिंडी काढण्यात आली.
   विठ्ठल-रुक्मिणी,संत ज्ञानेश्वर,तुकाराम,मुक्ताबाई आदी संतांच्या वेशभूषा करून बालकांनी या दिंडीत सहभाग घेतला. शाळा परिसरात काढण्यात आलेल्या या दिंडीत चिमुकल्यांनी अभंग व गाणी सादर केली."ज्ञानोबा-माऊली" च्या जयघोषाने परिसरात मंगलमय वातावरण तयार झाले.माता पालकांनीही दिंडीत सहभाग घेत पाऊल व फुगडी खेळली. भारतीय संस्कृतीची मुलांना ओळख व्हावी या उद्देशाने आयोजित या दिंडीत मुख्याध्यापिका मंजुषाताई जोशी यांनी पालखीची पूजा केली. मुलांना प्रसादाचे वाटप करून दिंडीची सांगता झाली.कार्यक्रम प्रमुख गीताताई कुलकर्णी यांच्यासह राजकन्याताई जाधव व शिक्षक प्रतिनिधी सुवर्णाताई कोळनुरकर यांच्यासह सर्व ताईंनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने