पी.एस.क्लासेस तर्फे गुणवंतांचा सत्कार

पी.एस.क्लासेस तर्फे गुणवंतांचा सत्कार

औसा(प्रतिनिधी)-माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार समारंभ पी.एस.क्लासेसच्या वतीने दि.7 जून रोजी आयोजित करण्यात आला होता.तालुक्यातील सलग सर्वोत्तम निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखत महाराष्ट्रातील निकालात पी.एस. क्लासेसने आपला दबदबा कायम ठेवला आहे.नक्कीच या निकालाने क्लासेसच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सलग तिसऱ्या वर्षी विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून वागदरे ईश्वरी शिवशंकर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवून महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.शेख परवेज आसिफ व नलगे श्रेयश दत्तात्रेय या विद्यार्थ्याने 97.40% टक्के गुण मिळवून अजीम हायस्कूल औसा मधून प्रथम क्रमांक तर बनसोडे प्राजक्ता बळीराम हिने 97% घेऊन द्वितीय,शारवाले बेनझीर मोटूलाल हिने 96.80% घेऊन  तृतीय क्रमांक मिळवला आहे तर शेख अमान इकबाल याने 93.60% घेऊन अजीम हायस्कूल औसा मधून सातवा क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच मोरे सिद्धी श्रीराम,भुजबळ विशाल यशपाल,चव्हाण प्रियंका प्रशांत,आळंगे रूषीकेश प्रल्हाद,शेख बुशरा हक्कानी,शारवाले रेहान मोतुलाल,दुधनकर समृद्धी विशाल,पाटील  निखिल प्रविण,चिरके शिवम जालिंदर,पटेल समिरा शादुल,पठाण आफरा नसिरखान,इनामदार अक्सा सिकंदर,शेख तलहा एजाज या विद्यार्थ्यानींही विशेष प्राविण्यात यश संपादन केल्याबद्दल कलाससेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लद्दे सर तर प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख आर.एम.सर व पी.डी.बनसोडे सर तसेच सर्व पालक व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.शेवटी उपस्थित पालकां मधून प्रा.शेख अंजुमनेहा इकबाल यांनी शुभेच्छारुपी संदेश देताना सांगितले की पी.एस.क्लासेसच्या वतीने सर्व मुलांची चांगली तयारी करून घेण्यात आली,वेळेला महत्व देऊन सतत न चूकता अभ्यास,सराव परीक्षा घेण्यात आली व हे यश आज आपल्या समोर आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विषयाचे शिक्षक श्री.अमोल सरवदे सर  यांनी तर आभार गोरे प्रवीण सर यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने